Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Dairy Product : खबरदार ! दूध, दुग्धजन्य पदार्थात भेसळ कराल, तर कारवाईला सामोरे जाल ! 

Dairy Product : खबरदार ! दूध, दुग्धजन्य पदार्थात भेसळ कराल, तर कारवाईला सामोरे जाल ! 

Dairy Product: Beware! If you adulterate milk and dairy products, you will face action!  | Dairy Product : खबरदार ! दूध, दुग्धजन्य पदार्थात भेसळ कराल, तर कारवाईला सामोरे जाल ! 

Dairy Product : खबरदार ! दूध, दुग्धजन्य पदार्थात भेसळ कराल, तर कारवाईला सामोरे जाल ! 

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळ नियंत्रण समिती दूध व दुग्धजन्य पदर्थात  भेसळ अढळल्यास कारवाई केली जाणार आहे. (Dairy Product)

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळ नियंत्रण समिती दूध व दुग्धजन्य पदर्थात  भेसळ अढळल्यास कारवाई केली जाणार आहे. (Dairy Product)

शेअर :

Join us
Join usNext

Dairy Product :
बुलढाणा : ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळ नियंत्रण समिती दूध व दुग्धजन्य पदर्थात  भेसळ अढळल्यास कारवाई केली जाणार आहे. सणासुदीच्या दिवसांत अनेक ठिकाणी, मिठाई व गोडधोड पदार्थ बनविण्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर केला जातो. खवा, बर्फी, मावा, पेढा, मिठाई बनविण्यासाठी लागणारे दूध व खवासारख्या पदार्थांमध्ये भेसळ होण्यास नाकारता येत नाही.

त्यामुळे अशी भेसळ रोखण्यासाठी शासनाने दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळ नियंत्रण समिती गठित केली असून, भेसळ करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळ नियंत्रण समिती गठित केली आहे. त्यामध्ये अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक, पशुसंवर्धन उपायुक्त, वजन-माप नियंत्रक अधिकारी सदस्य असून जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत.

जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा आणि सिंदखेडराजा, देऊळगावराजा परिसरात बऱ्याच ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे स्थानिक व्यावसायिक आहेत. २५ ऑक्टोबर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी जी. के. वसावे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ. डी. एन. काळे यांनी तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच नांदुरा रेल्वेस्थानक परिसरात भेट देऊन नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दिली आहे.

१४९ किलो खव्याचा साठा जप्त

जिल्हास्तरीय भेसळ नियंत्रण समितीच्या मदतीने तपासणीदरम्यान २५ ऑक्टोबरला नांदुरा येथील जगन्नाथ गवळी यांच्याकडून खवा व अन्नपदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. अन्नपदार्थ कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून ३२ हजार ७९० किमतीचा १४९ किलो खव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

२२ नमुने घेतले तपासणीसाठी

जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दिवाळीनिमित्त विशेष मोहीम सुरु आहे. सदर मोहिमेंतर्गत दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल, तूप, फरसाण, रवा, बेसन आदी पदार्थांचे आतापर्यंत २२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

काय काळजी घ्याल

* अन्नपदार्थ खरेदी करताना परवाना व नोंदणीधारक व्यावसायिकांकडून खरेदी करावी. 

* अन्नपदार्थाचे खरेदी बिल घेऊन जतन करावे.

* अन्नपदार्थ खरेदी करताना एक्सपायरी दिनांक (Expiry Date) तपासून घ्यावी.

* मिठाई, दूध व दुग्धजन्य पदार्थ ताजे व आवश्यकतेनुसारच खरेदी करावेत.

* माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासांच्या आत करावे.

* अन्नपदार्थांची चव, वास आदीमध्ये फरक जाणवल्यास मिठाई सेवन करु नये.

सणासुदीत दूध व दुग्धजन्य पदार्थाना अधिक मागणी असते. हे लक्षात या पदार्थामध्ये भेसळ करण्याची शक्यता वाढते. त्यासाठी समितीने जिल्हास्तरावर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनीही खबरदारी बाळगावी. - प्रमोद पाटील, सहाय्यक आयुक्त, अन्न व प्रशासन, बुलढाणा.

Web Title: Dairy Product: Beware! If you adulterate milk and dairy products, you will face action! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.