Join us

Detection of mastitis in bovines 'या' किटच्या मदतीने घरीच करा मस्टायटीसची तपासणी

By रविंद्र जाधव | Published: July 15, 2024 5:39 PM

'लॅटरल फ्लो इम्युनोसे स्ट्रिप अँड मेथड फॉर डिटेक्शन ऑफ मॅस्टिटिस इन बोवाइन्स' या नावाच्या संशोधित किट द्वारे आता अवघ्या काही मिनिटात स्तनदाहाची निदान करता येणे शक्य होणार आहे.

दुधाळ जनावरांमध्ये पशुपालकाची सर्वाधिक आर्थिक हानी करणारा आजार म्हणजे स्तनदाह ज्यालाच दगडी किंवा मस्टायटीस असेही म्हटले जाते. यात आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर (IITK) यांनी आधुनिक संशोधन केलेले एक नवीन यंत्र किट विकसित केली आहे. 'लॅटरल फ्लो इम्युनोसे स्ट्रिप अँड मेथड फॉर डिटेक्शन ऑफ मॅस्टिटिस इन बोवाइन्स' या नावाच्या संशोधित किट द्वारे आता अवघ्या काही मिनिटात स्तनदाहची निदान करता येणे शक्य होणार आहे.

या किटचे संशोधन रसायन अभियांत्रिकी विभाग,  IIT कानपूर आणि राष्ट्रीय केंद्राचे प्रा. सिद्धार्थ पांडा आणि डॉ. सत्येंद्र कुमार, वरिष्ठ प्रकल्प शास्त्रज्ञ, SCDT, IIT कानपूर (IITK) यांनी केले आहे. या तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट कार्यालयाने भारतीय पेटंट क्रमांक ४५५२३२ ने मंजूर दिली असून पॉलीक्लोनल अँटीबॉडी आणि स्ट्रिप चाचणीच्या रूपात नवीन डिझाइन वापरून ही किट तयार करण्यात आली आहे.

दुभत्या जनावरांमध्ये स्तनदाह शोधण्यात क्रांती घडवून आणण्याचे या अभिनव तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट आहे. त्याचा व्यापक वापर सुलभ करण्यासाठी डेअरी उत्पादक कंपनीसोबत तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करार देखील पूर्ण केला गेला आहे. 

स्तनदाह (मस्टायटीस) हे डेअरी उद्योगांमध्ये आर्थिक नुकसानीचे एक प्रमुख कारण मानले जाते, ज्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होते. तसेच दुधाची गुणवत्ता देखील खराब होते. या रोगामध्ये स्तन ग्रंथी व कासेच्या ऊतीमध्ये एक दाहक क्रिया घडते जी शारीरिक आघात किंवा सूक्ष्मजीव संसर्गामुळे होते. ज्यामुळे पशुपालकाची मोठी आर्थिक होत असते. अशावेळी ही संशोधित किट वापरुन अवघ्या काही वेळात स्तनदाहचे निदान करणे सोपे होणार आहे. 

या किटद्वारे अशी होते तपासणी

या किट मध्ये दुधाचे काही थेंब टाकल्यावर अवघ्या काही क्षणात मस्टायटीसचे निदान होते. हाताळणीस सोप्या असलेल्या या किटद्वारे पशुपालक देखील सहजरित्या मस्टायटीसचे निदान करू शकतात.  

 

“आयआयटी कानपूर हे व्यावहारिक तंत्रज्ञान तयार करण्यासाठी समर्पित आहे ज्यामुळे समाजाला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, आणि मला विश्वास आहे की आमचे स्तनदाह शोधण्याचे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करू शकते, आम्हाला हे पाहून आनंद होत आहे की आमचे तंत्रज्ञान हे यशस्वी झाले आहे. - प्रो. मनिंद्र अग्रवाल संचालक आयआयटी कानपूर.

“दुग्ध गुरांचे आरोग्य आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी स्तनदाह वेळेवर ओळखणे महत्त्वाचे आहे, आमचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना जलद, विश्वासार्ह आणि किफायतशीर उपाय प्रदान करते, यामुळे आर्थिक घट करण्यासाठी त्वरित कारवाई करणे शक्य होते. तोटा आणि स्तनदाहाच्या गंभीर प्रकरणांचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे एकूणच दुधाची गुणवत्ता आणि उत्पन्न सुधारते." - प्रा. तरुण गुप्ता, डीन संशोधन आणि विकास विभाग आयआयटी कानपूर.

हेही वाचा - Animal Care In Rain शेतकरी दादा ! पावसाळ्यात आजारांचा धोका, पशुधनाची काळजी घ्या

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीदूधगायशेती क्षेत्रकानपूर आयआयटी