Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > म्हशीचे दुध काढताना या सोप्या गोष्टी करा, म्हैस कधीच कमी दूध देणार नाही

म्हशीचे दुध काढताना या सोप्या गोष्टी करा, म्हैस कधीच कमी दूध देणार नाही

Do these simple things to increase the milk of buffaloes | म्हशीचे दुध काढताना या सोप्या गोष्टी करा, म्हैस कधीच कमी दूध देणार नाही

म्हशीचे दुध काढताना या सोप्या गोष्टी करा, म्हैस कधीच कमी दूध देणार नाही

म्हैस हा काटक प्राणी आहे. दुग्धव्यवसायामध्ये दुधाळ गायींबरोबरच दुभत्या म्हशींचाही मोलाचा वाटा आहे. म्हशींचे खाद्य, आरोग्य व्यवस्थापन योग्य ठेवले तर त्या कमी आजारी पडतात.

म्हैस हा काटक प्राणी आहे. दुग्धव्यवसायामध्ये दुधाळ गायींबरोबरच दुभत्या म्हशींचाही मोलाचा वाटा आहे. म्हशींचे खाद्य, आरोग्य व्यवस्थापन योग्य ठेवले तर त्या कमी आजारी पडतात.

शेअर :

Join us
Join usNext

म्हैस हा काटक प्राणी आहे. दुग्धव्यवसायामध्ये दुधाळ गायींबरोबरच दुभत्या म्हशींचाही मोलाचा वाटा आहे. म्हशींचे खाद्य, आरोग्य व्यवस्थापन योग्य ठेवले तर त्या कमी आजारी पडतात.

  • म्हशींचे दुधदोहण शांत वातावरणात करावे. कर्कश मोठा आवाज उदा. फटाक्यांचा आवाज, लाऊडस्पिकरचा आवाज याने म्हशी बिचकू शकतात. त्यांचे रवंथ कमी होते. दुधाचे प्रमाण कमी होते. यामुळे शांततेत दुध दोहन करावे.
  • म्हशींवर उष्ण वातावरणात गार पाणी मारावे. थंडीत त्यांच्या अंगावर उबदार गोणे टाकावे. म्हशींना पाण्याचा फवारा, तुषार यापेक्षा डुंबण्यासाठी डोह अगर वेगळा हौद असेल तर उत्तम.
  • सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत असे डुंबावयास सोडावे, ताज्या व्यालेल्या म्हशी व्याल्यानंतर सात-आठ दिवस डुंबावयास सोडू नयेत. त्यांना गोठ्यातच गार पाणी मारावे.
  • म्हशींना नियमित वेळेवर ताजे, स्वच्छ पाणी पाजावे. प्रत्येक म्हशीला बसण्यासाठी आडवे रेलण्यासाठी पुरेशी जागा आवश्यक आहे. तशी जागा नसेल तर उठतांना एकमेकांच्या सडावर पाय पडून सडांना इजा होऊ शकते.
  • म्हशींच्या गोठ्यातील जमीन निसरडी नसावी. नाहीतर म्हशी घसरुन त्यांचे पाय मोडू शकतात. अशा निसरड्या जमिनीवरून उठताना मागच्या पायाच्या खुरांचा फटका सडावर-कासेवर बसतो व कासेला/सडांना इजा होते.


अधिक वाचा: कमी खर्चातील पशुखाद्य अझोला कसा तयार कराल?

  • म्हशींना बादलीने पाणी पाजत असताना किमान दिवसातून तिनदा पाणी पाजावे.
  • म्हशी या सवयीच्या गुलाम आहेत. तेव्हा रोजचे खाद्य घटक यांत अचानक बदल करू नये. व्यवस्थापनात मोठा बदल करू नये. तिला जेवढे प्रेम द्याल तेवढी ती व्यवस्थित रूळेल व चांगले दूध देईल.
  • दूध काढण्यापूर्वी त्यांना व्यवस्थित पान्हवायास हवे. या बाबत जी सवय त्यांना लावू त्यावर तिचे पान्हवणे अवलंबून आहे.
  • पाठीवर थाप मारणे, शिळ वाजवणे, भिजवलेले आंबोण समोर ठेवणे, कास कोमट पाण्याने धुणे इ. सवयी असु शकतात.
  • दूध काढताना आंबोण द्यावयाचे अथवा लगेच नंतर द्यावयाचे हे त्यांना जी सवय लावू त्यावर अवलंबून आहे. पण एकदा का त्यांनी पान्हा सोडला की लगेच दूध काढावयास हवे.
  • म्हशींना उष्णता अजिबात सहन होत नाही. वातावरणातील तापमानात होणारा बदल पचविण्यासाठी श्वासोच्छास आणि शरीर तापमान यांची सांगड घालण्यासाठी म्हशींना अधिक काळ लागतो.
  • गोठ्याच्या सभोवताली सावली असणारी उंच झाडे लावल्यास गोठ्यातील तापमान थंड राखण्यास मदत होते.
  • म्हशींचा गोठा व त्यातील तापमान थंड करण्यासाठी गोठ्याच्या छतावर तापमान रोधक बाबी पसरणे आवश्यक असते.


संशोधन प्रकल्प,
पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा

Web Title: Do these simple things to increase the milk of buffaloes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.