Join us

दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या 'या' गाईविषयी माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 8:47 PM

या गायी दूध जास्त देतात. त्यामुळे त्यांचा दुधासाठी जास्त वापर केला जातो.

आपल्या भारतात प्रांतानुसार आणि हवामानानुसार वेगवेगळे प्राणी आढळतात.  तेथील उपलब्ध असलेल्या संसाधनांनुसार त्यांची वाढही होत असते. एखाद्या भागातील जनावरे दुधासाठी, एखाद्या भागातील जनावरे शेतीतील कामासाठी तर काही भागातील जनावरे चपळ असतात. त्यांचा प्रदर्शनासाठी वापर केला जातो. पण कालांतराने मानवाने विविध भागांतील जनावरे पाळायला सुरूवात केल्यामुळे जनावरांचे स्थलांतर झाले आणि ज्या त्या भागातील विशिष्ट जात जगापर्यंत पोहोचली. 

सध्या भारतात गीर, सहिवाल, थारपारकर, खिलार, देवणी, लाल कंधार आणि आणखी बऱ्याच देशी वंशाच्या गायी आहेत. पण महाराष्ट्रात देवणी, लाल कंधारी, खिलार आणि कोकण कपिला या देशी गायी प्रामुख्याने आढळतात. गीर,  सहिवाल, थारपारकर या दुसऱ्या प्रदेशातल्या जाती असून पंजाब, हरियाणा आणि सिंध प्रांतात आढळणारी सहिवाल ही गाय दुधाच्या वैशिष्ट्यांमुळे राज्यात आली आहे. त्यांना येथील वातावरण अनुकूल ठरू लागले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या गायी पाळायला सुरूवात केली. 

सहिवाल गायीचे वैशिष्ट्ये

साहिवाल गायीची उपनावे - मुलतानी, लोला, मोंटगोमेरी, लांबी बार

मुळस्थान - सीमा भागातील पंजाब, मोंटगोमेरी आणि मुलतान प्रांत तसेच पाकीस्तान मधील पंजाब मधून देशातील इतर रा.यात नेवून सांभाळल्या जातात.

शारिरीक वैशिष्ट्ये - लाल रंग, लोंबती कातडी, आखुड कानावर गोल वळलेली शिंगे, लोंबती गळापोळी आणि बेंबट लांब, चाबका सारखे शेपूट, बैलामध्ये मोठे वशिंड, वळूचे वजन ५५० किलो आणि गाय ३००-३५० किलो.

दुधउत्पादन - देशातील सर्वोत्तम दुधाळ जात आहे. वेतातील सरासरी दुग्धोत्पादन १६०० ते २७५० कि. दुधातील स्निग्धांशाचे प्रमाणे ४.९% असते.

उपलब्धता - एन.डी. आर. आय. करनाल (हरीयाणा राज्य), नवी दिल्ली, कृषि महाविद्यालय, कानपूर, तसेच पंजाब मधील खाजगी गोठ्यातून गायी मिळतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीगायदुग्धव्यवसाय