Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Dudh Anudan : या जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर १५ कोटी; आणखी ११ कोटी मंजूर

Dudh Anudan : या जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर १५ कोटी; आणखी ११ कोटी मंजूर

Dudh Anudan : 15 crores on account of milk producer farmers in this district; Another 11 crore approved | Dudh Anudan : या जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर १५ कोटी; आणखी ११ कोटी मंजूर

Dudh Anudan : या जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर १५ कोटी; आणखी ११ कोटी मंजूर

शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रतिलिटर ५ व ७ रुपये अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघांकडील ४९ हजार गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर १५ कोटी ३० लाख ३७ हजार ९९० रुपये रक्कम अनुदान जमा केले आहे.

शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रतिलिटर ५ व ७ रुपये अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघांकडील ४९ हजार गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर १५ कोटी ३० लाख ३७ हजार ९९० रुपये रक्कम अनुदान जमा केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सदानंद औंधे
मिरज : शासनाने गायदूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रतिलिटर ५ व ७ रुपये अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघांकडील ४९ हजार गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर १५ कोटी ३० लाख ३७ हजार ९९० रुपये रक्कम अनुदान जमा केले आहे.

जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत खासगी व सहकारी दूध संघाकडे पाठविलेल्या दुधाचे हे अनुदान आहे. आणखी ११ कोटी १ लाख रुपये मंजूर असून, १२ कोटी ९६ लाख ८३ हजार रुपये अनुदानाचे प्रस्ताव दाखल आहेत.

हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना चार महिन्यांत ७ कोटी ८५ लाख ७२ हजार लिटर दूध उत्पादनापोटी एकूण ३९ कोटी २८ लाख रुपये ६४ हजार रुपये अनुदान मिळणार असल्याचे जिल्हा दुग्धविकास अधिकारी नामदेव दवडते यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर पडल्याने शेतकऱ्यांना अनुदान म्हणून १० जानेवारी ते १० मार्च यादरम्यान दुग्धविकास विभागाने ही योजना सुरू केली. शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे ही योजना पुन्हा जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांसाठी वाढवली.

यात जुलै ते सप्टेंबरपर्यंत प्रतिलिटर पाच रुपये व ऑक्टोबर महिन्यासाठी प्रतिलिटर सात रुपये गायीच्या दुधासाठी अनुदान योजना आहे. नोव्हेंबर महिन्यात अनुदान योजना थांबविली असून, ते सुरू करण्याबाबत आढावा घेणार आहे.

चितळेच्या सभासदांना सर्वाधिक अनुदान
जिल्ह्यात वाटप केलेल्या अनुदानापैकी चितळे डेअरीच्या सभासदांना सर्वाधिक २ कोटी ७७ लाख रुपये व राजारामबापू दूध संघाच्या सभासदांना २ कोटी ६४ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. त्यानंतर फत्तेसिंगराव नाईक दूध संघ ३३ लाख ५३ हजार रुपये, अग्रणी मिल्क १ कोटी १६ लाख २५ हजार रुपये, संपतराव देशमुख ३६ लाख, ८८ हजार रुपये, शिवनेरी मिल्क ९६ लाख ६१ हजार रुपये यांसह इतर सहकारी व खासगी दूध संघांच्या सभासदांना दुधाचे अनुदान मिळाले आहे.

अधिक वाचा: Pashu Ganana 2024 : आत्तापर्यंत केलेल्या पशुगणनेत २१ वी पशुगणना कशी वेगळी आहे वाचा सविस्तर

Web Title: Dudh Anudan : 15 crores on account of milk producer farmers in this district; Another 11 crore approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.