Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Dudh Anudan : दूध अनुदान योजना संपणार नोव्हेंबरचे अनुदान कधी मिळणार

Dudh Anudan : दूध अनुदान योजना संपणार नोव्हेंबरचे अनुदान कधी मिळणार

Dudh Anudan : Milk subsidy scheme will end when will November subsidy be available | Dudh Anudan : दूध अनुदान योजना संपणार नोव्हेंबरचे अनुदान कधी मिळणार

Dudh Anudan : दूध अनुदान योजना संपणार नोव्हेंबरचे अनुदान कधी मिळणार

राज्य सरकारने गाय दूध अनुदान खरेदीवर प्रतिलिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली, पण अनुदानाची माहिती भरण्याचे लॉगिनच गेली महिनाभर बंद आहे.

राज्य सरकारने गाय दूध अनुदान खरेदीवर प्रतिलिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली, पण अनुदानाची माहिती भरण्याचे लॉगिनच गेली महिनाभर बंद आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राजाराम लोंढे
कोल्हापूर : राज्य सरकारनेगायदूध अनुदान खरेदीवर प्रतिलिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली, पण अनुदानाची माहिती भरण्याचे लॉगिनच गेली महिनाभर बंद आहे.

सप्टेंबरपर्यंतची माहिती भरली असून, ३० नोव्हेंबरला योजना संपणार आहे. आतापर्यंत ३६० कोटींचे अनुदान राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाटप केले असून, अजून किमान ५०० कोटींची गरज आहे.

गेले एक वर्ष गाय दुधाचे उत्पादन वाढले आणि मागणी कमी असल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांसाठी प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान दिले.

जुलैपासून प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान केले. निवडणुकीच्या तोंडावर ऑक्टोबरपासून सात रुपये अनुदान केले. जुलै ते सप्टेंबरपर्यंतीची दूध उत्पादकांची माहिती भरली आहे. त्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

या कालावधीतील गाय दुधाचे संकलन पाहता किमान ८५० कोटी रुपये अनुदानापोटी लागणार आहेत. त्याशिवाय ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे राहणार आहेत. मात्र, या दोन महिन्यांची माहिती भरण्यासाठी सरकारचे लॉगिनच बंद आहे.

बटर वधारले, पण 'जीएसटी'ने परवडेना
● गाय व म्हैस बटरच्या दरात वाढ होत आहे. सध्या गायीचे ३९० रुपये, तर म्हशीचे ४०० रुपयांच्या पुढे दर मिळत आहे.
● पण, त्यासाठी दूध संघांना तब्बल १२ टक्के जीएसटी द्यावा लागत असल्याने किलोमागे जीएसटीपोटी ४७ ते ४८ रुपये जात असल्याने संघांची अडचण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पावडर २३५ रुपयांवर
आंतरराष्ट्रीय पातळीवर गाय दूध पावडर वधारला आहे. प्रतिकिलो २३० ते २३५ रुपये किलोपर्यंत दर आहे. मात्र, देशांतर्गत बाजारपेठेत अद्याप २१० रुपयांपर्यंतच दर आहे.

अनुदान मिळते म्हणून दर कपात
राज्य सरकारने गाय दुधाला प्रतिलिटर पाच वरून सात रुपये अनुदान जाहीर केले आणि राज्यातील दूध संघांनी गाय खरेदी दरात तीन रुपयांची कपात केली आहे.

दृष्टिक्षेपात दूध अनुदान
■ ११ जानेवारी ते १० मार्च २०२४ - ३६० कोटी (वाटप)
■ १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ - ८५० कोटी (प्रलंबित)
■ १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२४ - अद्याप माहितीच भरलेली नाही.

अधिक वाचा: राज्यात या जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी वाढ; दररोज १५ लाख लिटर दूध संकलन

Web Title: Dudh Anudan : Milk subsidy scheme will end when will November subsidy be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.