Join us

Dudh Anudan: दूध अनुदान लवकर मिळणार, माहिती संकलनासाठी केले हे मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 10:14 AM

गाय दूध अनुदानासाठी आता लहान लहान दूध प्रकल्पांसह मोठ्या दूध संघांच्या चिलींग सेंटरला लॉगीन आयडी मिळणार असून, माहिती भरण्याच्या कामाला गती देण्यासाठी दुग्ध विभागाने हे पाऊल उचलले आहे.

कोल्हापूर : गाय दूध अनुदानासाठी आता लहान लहान दूध प्रकल्पांसह मोठ्या दूध संघांच्या चिलींग सेंटरला लॉगीन आयडी मिळणार असून, माहिती भरण्याच्या कामाला गती देण्यासाठी दुग्ध विभागाने हे पाऊल उचलले आहे.

बुधवार (दि. १०) पर्यंत संबंधित प्रकल्पांनी दुग्ध विभागाकडे अर्ज करावेत, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रकाश आवटे व सांगली जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी नामदेव दवडते यांनी केले आहे.

राज्य सरकारने मार्च महिन्यात गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन महिने अनुदान दिले. त्यानंतर अनुदान बंद करण्यात आले होते. मात्र, गायीच्या दुधाचे दर कमी होऊ लागल्याने राज्य शासनाने १ जुलैपासून अनुदान पुन्हा सुरू केले आहे.

त्यासाठी दूध उत्पादकाची दर दहा दिवसांची माहिती ऑनलाइन भरायची आहे. केवळ जिल्हास्तरीय मोठ्या दूध संघांना माहिती भरण्याचे लॉगीन दिल्याने ते काम वेळेत पूर्ण होत नाही. यासाठी छोट्या छोट्या प्रकल्पांना लॉगीन दिले तर पटकन माहिती भरली जाऊ शकते, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉगीन आयडी देणार पण, या अटी राहणार• शीतकरण केंद्र अथवा दुग्ध प्रकल्प याचे किमान दूध संकलन प्रतिदिन १० हजार लिटर असावे.• प्रकल्पाचे 'एफएसएसएआय' नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करण्यात यावे.• प्रकल्पाने मेकर व चेकर यांची नावे, मोबाइल नंबर व ई-मेल आयडीसोबत द्यावी.• सध्याची होत असलेली हाताळणी व विनियोग याचा तपशील सोबत सादर करावा.

३० सप्टेंबरपर्यंत मिळणार अनुदानदूध अनुदानाची मुदत १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत राहणार आहे. पशुधन टॅगींगसह इतर माहिती भरणे सक्तीचे असल्याने पहिल्या टप्प्यातील अनुदानापासून सुमारे २० हजार दूध उत्पादक वंचित राहिले होते.

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधदूध पुरवठासरकारराज्य सरकारशेतकरी