Join us

Dudh Anudan : या जिल्ह्यातील पावणेदोन लाख दूध उत्पादकांना मिळाले ९६ कोटीचे दूध अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 10:57 AM

पशुधनाचा विकास आणि दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी सहकारी दूध संघ आणि खासगी प्रकल्पांना दूध पुरविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात येते.

अहिल्यानगर : पशुधनाचा विकास आणि दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी सहकारी दूध संघ आणि खासगी प्रकल्पांना दूध पुरविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे अनुदान देण्यात येते.

जुलै २०२४ अखेर जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार ९९९ दूध उत्पादक शेतकऱ्यांना ९६ कोटी १९ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.

राज्यातील सहकारी दूध संघ आणि खासगी प्रकल्पांना दूध पुरविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये, दूध भुकटी निर्यातीस ३० रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान आणि राज्यांतर्गत उत्पादित होणाऱ्या दूध भुकटीस प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

जिल्ह्यातील २ लाख ७ हजार ८८४ दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै २०२४ अखेर ३० कोटी ७१ लाख रुपयांचे अनुदानाचा लाभ झाला. सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ९ लाखांहून अधिक पशुंचे लाळ खुरकत आणि पीपीआर लसीकरण, तर ११ लाखांपेक्षा अधिक पशुंचं लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.

लम्पी चर्मरोगामुळे मृत झालेल्या ४ हजार ७७६ पशुंबद्दल पशुपालकांना १२ कोटी २० लाख ८१ हजार रुपये वितरित करण्यात आले. राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुखाद्य व वैरणाची ३ आणि शेळी- मेंढीपालनाची ९ प्रकरणे मंजूर करण्यात आली.

१० हजार शेतकऱ्यांना ३६ कोटींचे वाटपजिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना आणि ओटीएसपी अशा विविध माध्यमातून एक हजार मांसल पक्षी संगोपन युनिटची उभारणी, १०१ शेळी-मेंढी गट वाटप करणे, दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे (जि.प.), शेळ्या-मेंढ्यांचे गट पुरविणे अशा विविध योजनांसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत २०२२-२३ मध्ये ४ हजार ८४६ लाभार्थ्यांना १४ कोटी ९५ लाख ३५ हजार रुपये, तर २०२३-२४ मध्ये ५ हजार ८८० लाभार्थ्यांना २० कोटी ७६ लाख ४ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले.

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेतकरीगायराज्य सरकारसरकारसरकारी योजनाअहमदनगरलम्पी त्वचारोग