Join us

Dudh Fat : पावसाळ्यात दुधाला फॅट कमी का लागते? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 2:36 PM

महाराष्ट्रामध्ये गायीच्या दुधात किमान फॅट ३.८; तर म्हशीच्या दुधात ६ फॅट असणे आवश्यक असते. त्यापेक्षा फॅट कमी असल्यास ते दूध अप्रमाणित समजले जाते.

महाराष्ट्रामध्ये गायीच्या दुधात किमान फॅट ३.८; तर म्हशीच्या दुधात ६ फॅट असणे आवश्यक असते. त्यापेक्षा फॅट कमी असल्यास ते दूध अप्रमाणित समजले जाते. दुधाची किंमत स्निग्धांशावर ठरविली जाते.

पावसाळ्यात भरपूर प्रमाणात कोवळा व हिरवा चारा उपलब्ध असतो. त्यामुळे दुधाळ जनावरांना खूप जास्त प्रमाणात हिरवा चारा खाऊ घातला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये तंतुमय घटक आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे दुधातील फॅट कमी लागते.

दुधातील फॅट म्हणजे काय?सॉलिड नॉट फॅट हा दुधात असणारा पोषक घटक आहे, जो दुधाची चरबी आणि पाण्याव्यतिरिक्त असतो. त्यात प्रथिने (प्रामुख्याने केसिन आणि लॅक्टलब्युमिन), कार्बोहायड्रेट्स (प्रामुख्याने लॅक्टोज) आणि खनिजे (कॅल्शियम आणि फॉस्फरससह) असतात. जेव्हा दुधाच्या चरबीसह एकत्र केले जाते, तेव्हा त्याला एकूण घनपदार्थ म्हणतात.

दुधात फॅट आवश्यक किती?म्हैस : म्हशीच्या दुधात ६ फॅट असणे आवश्यक असते.गाय : गायीच्या दुधात किमान फॅट ३.८ असते.

फॅट वाढीसाठी आहार महत्त्वाचा१) हिरवा चारा : पावसाळ्यात भरपूर हिरवा चारा देत असतो. त्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी व पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फॅट कमी लागते, त्यासाठी हिरव्या चाऱ्यांबरोबर वाळलेला चारा देणे गरजेचे आहे.२) वाळलेला चारा : जनावरांच्या आहारात एकूण तंतुमय घटकांचे प्रमाण म्हणजेच वैरणाचे प्रमाण २८ ते ३१ टक्के असणे आवश्यक आहे. दुधाळ जनावरांना आहारातून एकूण ६५ टक्के कडब्याचे प्रमाण पाहिजे.

दुधाच्या फॅटवर देत असलेल्या आहाराचादेखील परिणाम होतो. आपण कोवळा, हिरवा चारा देत असतो. त्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी व पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फॅट कमी लागते, त्यासाठी आपण नियमित हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेला चारा देणे आवश्यक आहे. - डॉ. व्यंकटराव घोरपडे, सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधदूध पुरवठाशेतकरीशेतीगाय