Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Ear Tagging : जनावरांच्या बाजारातही होणार आता पशुधनांची एअर टॅगिंग; पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार

Ear Tagging : जनावरांच्या बाजारातही होणार आता पशुधनांची एअर टॅगिंग; पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार

Ear Tagging: Air tagging of livestock will also be done in animal markets; An initiative of the Department of Animal Husbandry | Ear Tagging : जनावरांच्या बाजारातही होणार आता पशुधनांची एअर टॅगिंग; पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार

Ear Tagging : जनावरांच्या बाजारातही होणार आता पशुधनांची एअर टॅगिंग; पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार

या माध्यमातून भारत पशुधन या प्रणालीवर देशातील सर्व पशुंची अद्ययावत माहिती अपडेट करण्यात येणार आहे.

या माध्यमातून भारत पशुधन या प्रणालीवर देशातील सर्व पशुंची अद्ययावत माहिती अपडेट करण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे :

जनावरांना एअर टॅगिंग केल्याशिवाय १ जूनपासून जनावरांची खरेदी विक्री करता येणार नसल्याच्या सूचना राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून देण्यात आल्या होत्या. या माध्यमातून भारत पशुधन या प्रणालीवर देशातील सर्व पशुंची अद्ययावत माहिती अपडेट करण्यात येणार आहे. पण विभागाकडून मोहीम राबवण्यात आल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी जनावरांना एअर टॅगिंग केले नसल्याने आता जनावरांच्या बाजारामध्ये आलेल्या जनावरांची एअर टॅगिंग करण्यात येणार आहे. 

जनावरांची खरेदी विक्री करताना शेतऱ्यांची फसवणूक टाळणे तसेच राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक आहे. यामुळे विशिष्ठ भागातून जनावरांची खरेदी-विक्री वाढणे, चाऱ्याची टंचाई, दुधाचे भाव पडणे, दुष्काळ या अनुषंगाने निर्णय घेणे प्रशासनाला शक्य होणार आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या जनावरांची खरेदी विक्री टॅगिंग करुन झाल्यास त्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने करता येईल व बाहेरच्या राज्यातून आजारी जनावरे राज्यात दाखल झाल्याने होणारे साथ रोग प्रादुर्भाव यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

पशुधनाच्या बाजारामध्ये खरेदी-विक्रीसाठी करण्यात आलेल्या पशुधनाची माहिती विक्री करण्यात आलेलया संबंधित जिल्हयाच्या पशुसंवर्धन विभागास सादर करणे तसेच खरेदी-विक्री करण्यात आलेल्या पशुधनाची ईअर टॅगिंग करुन नोंदी अदयावत करणेबाबत निर्देशित केलेले आहे. तसेच बाजारामध्ये पशुधनाची ने-आण करताना कोणत्याही प्रकारची क्रुरता होणार नाही याची देखील दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात सुमारे १५० पेक्षा अधिक जनावरांचे बाजार भरतात ज्यातील १५ बाजार सर्वात मोठे असून त्यामध्ये ५००० पेक्षा अधिक पशुधनाची खरेदी-विक्री करण्यात येते. ८०% पशुधनाच्या बाजारांमध्ये कमी, मध्यम संख्येच्या पशुधनाची खरेदी-विक्री केली जाते. पण बाजारात एअर टॅगिंग नसलेले पशुधन असल्यास त्यांची तिथेच एअर टॅगिंग केली जाणार आहे. यासंदर्भात पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक यांच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आता ज्या जनावरांना एअर टॅगिंग नाही अशा जनावरांना थेट बाजारात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Web Title: Ear Tagging: Air tagging of livestock will also be done in animal markets; An initiative of the Department of Animal Husbandry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.