Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > National Gopal Ratna Award 2024: पशुपालकानों तुमच्या पशुधनास मिळू शकते ५ लाखापर्यंतचे बक्षीस.. करा या पुरस्कारासाठी नाव नोंदणी

National Gopal Ratna Award 2024: पशुपालकानों तुमच्या पशुधनास मिळू शकते ५ लाखापर्यंतचे बक्षीस.. करा या पुरस्कारासाठी नाव नोंदणी

Farmers can get a reward of up to 5 lakhs for your livestock.. Register for this award | National Gopal Ratna Award 2024: पशुपालकानों तुमच्या पशुधनास मिळू शकते ५ लाखापर्यंतचे बक्षीस.. करा या पुरस्कारासाठी नाव नोंदणी

National Gopal Ratna Award 2024: पशुपालकानों तुमच्या पशुधनास मिळू शकते ५ लाखापर्यंतचे बक्षीस.. करा या पुरस्कारासाठी नाव नोंदणी

National Gopal Ratna Award 2024: राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत, २०२१ पासून हा विभाग दूध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था/एमपीसी/एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी National Gopal Ratna Award 2024 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करत आहे.

National Gopal Ratna Award 2024: राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत, २०२१ पासून हा विभाग दूध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था/एमपीसी/एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी National Gopal Ratna Award 2024 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका प्रदान करण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या प्रभावी विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

भारतातील देशी गोवंशाच्या जाती मजबूत आहेत आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची अनुवांशिक क्षमता त्यांच्याकडे आहे. स्थानिक गोवंश जातींचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन आणि विकास करण्याच्या उद्देशाने डिसेंबर २०१४ मध्ये 'राष्ट्रीय गोकुळ मिशन' सुरू करण्यात आले.

राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत, २०२१ पासून हा विभाग दूध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था/एमपीसी/एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करत आहे. यावर्षी देखील खालील श्रेणींसाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दिला जात आहे.

पुरस्कारांसाठी श्रेणी
-
देशी गायी/म्हशींच्या जातींचे संगोपन करणारे सर्वोत्तम दूध उत्पादक शेतकरी.
- सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था
- दूध उत्पादक कंपनी
- शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ)
सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AIT)
या वर्षापासून, विभागाने ईशान्य क्षेत्रातील राज्यांसाठी विशेष पुरस्कार समाविष्ट केला आहे जेणेकरुन ईशान्य प्रदेशातील  दुग्ध विकास उपक्रमांना प्रोत्साहन आणि चालना मिळेल.

पुरस्कार तपशील व स्वरूप
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार २०२४  वर नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक श्रेणीतील ईशान्य क्षेत्र राज्यांसाठी १ ला, २ रा, ३ रा आणि एक विशेष पुरस्कार प्रदान करेल.
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार २०२४ मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि पहिल्या दोन श्रेणींमध्ये उदा. सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट DCS/FPO/MPCs यांचा समावेश असेल.

देशी गायी/म्हशींच्या जातींचे संगोपन करणारे सर्वोत्तम दूध उत्पादक शेतकरी यांच्यासाठी गायी/म्हशींच्या जाती कोणत्या असाव्यात?
गाय: डांगी, देवणी, गौळाऊ, खिलार, लाल कंधारी, कोकण कपिला, काठाणी इ.
म्हैस: मराठवाडी, नागपुरी, पंढरपुरी, पुर्नाथडी इ.

पुरस्काराची रक्कम
पहिला क्रमांक : ५,००,०००/- (पाच लाख रुपये फक्त) 
दुसरा क्रमांक : ३,००,०००/- (तीन लाख रुपये फक्त)
तृतीय क्रमांक : २,००,०००/- (दोन लाख रुपये फक्त)
ईशान्य क्षेत्रासाठी विशेष पुरस्कार : २,००,०००/- (दोन लाख रुपये फक्त)

सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ श्रेणीच्या बाबतीत, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-२०२४ मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र आणि केवळ स्मृतिचिन्ह असेल. कृत्रिम रेतन तंत्रज्ञ श्रेणीमध्ये कोणतेही रोख बक्षीस दिले जाणार नाही.

अर्ज कुठे कराल?
- २०२४ वर्षात राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी नामांकन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल द्वारे ऑनलाइन https://awards.gov.in दाखल  केले जातील.
- १५/०७/२०२४ पासून सुरू होईल आणि नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख ३१/०८/२०२४ असेल.
- पात्रता आणि ऑनलाइन अर्ज करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल अधिक तपशीलांसाठी https://awards.gov.in किंवा https://dahd.nic.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.
- राष्ट्रीय दूध दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२४ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

संपर्क
अधिक माहितीसाठी आपल्या जवळील पशुधन विकास अधिकारी व सरकारी पशुवैद्यक दवाखान्यात संपर्क साधा.

Web Title: Farmers can get a reward of up to 5 lakhs for your livestock.. Register for this award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.