Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > शेतकरी, शेतमजूर यांना अनुदानावर मिळणार गाय, शेळी अन् मुरघास बॅग

शेतकरी, शेतमजूर यांना अनुदानावर मिळणार गाय, शेळी अन् मुरघास बॅग

Farmers, farm laborers will get cow, goat and silage bags on subsidy | शेतकरी, शेतमजूर यांना अनुदानावर मिळणार गाय, शेळी अन् मुरघास बॅग

शेतकरी, शेतमजूर यांना अनुदानावर मिळणार गाय, शेळी अन् मुरघास बॅग

शेतकरी, शेतमजूर, पशुपालकांसाठी पशुसंवर्धन विभाग वेगवेगळ्या योजना राबवताना दिसत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी नव्याने योजना जाहीर केल्या आहेत.

शेतकरी, शेतमजूर, पशुपालकांसाठी पशुसंवर्धन विभाग वेगवेगळ्या योजना राबवताना दिसत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी नव्याने योजना जाहीर केल्या आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

माळशिरस : शेतकरी, शेतमजूर, पशुपालकांसाठी पशुसंवर्धन विभाग वेगवेगळ्या योजना राबवताना दिसत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी नव्याने योजना जाहीर केल्या आहेत.

महामारी, दुष्काळ व विविध साथीच्या रोगातून पशुधनाच्या झालेल्या नुकसानीनंतर शेळ्या, गाय व चाऱ्यासाठी मुरघास बॅग आदी योजनेच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्हा परिषद उपकर योजना व जिल्हा वार्षिक योजनेमधून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेतील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी विविध योजना जाहीर केल्या असून, यासाठी २३ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना अथवा जिल्हा परिषदेच्यासंकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती माळशिरस तालुका पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

या योजनांचा मिळणार लाभ
७५ टक्के अनुदानावर ४ शेळ्या व १ बोकड, ५० टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन, ५० टक्के अनुदानावर मुरघास निर्मितीस प्रोत्साहन अंतर्गत मुरघास (सायलेज) बैंग, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर सायलेज बॅग, खनिज मिश्रण वापरासाठी कमाल २ दुधाळ पशुधनासाठी ३३ टक्के अनुदान अशा योजनांसाठी शेतकरी व
शेतमजुरांना अर्ज करता येणार आहेत.

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुपालकांसाठी अनेक लहान मोठ्या योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत अर्ज करून जास्तीत जास्त पशुपालकांनी याचा लाभ घ्यावा. - डॉ. प्रवीण शिंदे, पशुधन विकास अधिकारी, माळशिरस

Web Title: Farmers, farm laborers will get cow, goat and silage bags on subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.