कुठलाही व्यवसाय फायद्यात चालवायचा असेल तर त्या व्यवसायात नोंदवहीला अनन्यसाधारण महत्व आहे. नोंदी जर ठेवल्या तर आपल्या व्यवसायात आपण कुठे चुकतोय व त्यावर उपाय काय हे आपण सांगू शकतो. पण या चुका न कळल्यामुळे आपणाला गोठा बंद करण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही.
आपण आपल्याकडील जवळपास ८० ते ९०% शेतकऱ्याकडे पशुपालन व्यवसायातील कुठल्याही नोंदी नाहीत. आपल्या चुकांचे खापर त्या व्यवसायावर फोडतो व हा धंदा फायद्याचा नाही म्हणून आपण तो बंद करतो.
जर आपल्याकडे जनावरांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या नोंदी असतील तर आपण ते जनावर आपल्याकडे ठेवायचे का विकून टाकायचे हे ठरवू शकतो किंवा आवश्यक निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे या नोंदवहीचे महत्व आहे व दुग्ध व्यवसायात खालीलप्रमाणे काही महत्त्वाच्या नोंदी ठेवणे अतिशय आवश्यक आहे.
१) गाई-म्हशींच्या मुख्य नोंदी.
२) वैयक्तिक गाई-म्हशीचा तपशील.
३) प्रजननाविषयी नोंदीचा तपशील.
४) विण्याच्या नोंदीचा तपशील.
५) दररोजच्या दुग्धउत्पादनाच्या नोंदीचा तपशील.
६) उपचाराविषयीच्या नोंदी.
७) लसीकरण विषयक नोंदी.
८) जंतनिर्मुलन विषयक नोंदी.
९) रोगांच्या चाचण्याविषयीच्या नोंदी.
१०) वजन विषयक नोंदी.
११) गायींची/म्हशीची महिन्याची शारीरिक स्थिती.
१२) पोषण विषयीच्या नोंदी.
१३) गायीच्या/म्हशीच्या जमा खर्च विषयीच्या नोंदी.
१४) कामगार विषयीच्या नोंदी.
१५) कामगाराचे हजेरीपत्रक.
१६) विमा तपशील.
१७) प्रक्षेत्रावरील स्थायी सामान विषयक नोंदी.
१८) गायीची/म्हशीची एकूण उत्पादन कामगिरी नोंदी.
वरीलप्रमाणे सर्व नोंदी ठेवल्या तर जनावरांची संख्या न वाढवता उत्पादन वाढवता येऊ शकते. नोंदवह्या ठेऊन आपण आपला दुग्धव्यवसाय फायदेशीर करु शकतो.