Join us

जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची कसरत, पाणी नसल्याने पशुधन विकण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 9:46 AM

हस्तपोखरीत चाऱ्याचा प्रश्न गंभीर, चारा डेपो सुरु करण्याची मागणी

कमी पावसामुळे यंदा विहिरींनी तळ गाठलेला आहे. यामुळे पिकांचे उत्पादन कमी झाले आहे. तसेच चाऱ्याचे उत्पादनदेखील कमी झाले असल्याने हिरव्या चाऱ्याचा दर वाढलेला आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. जनावरांचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.

मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सध्या सुरू आहे. यामुळे उन्हाची तीव्रता वाढली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पाण्याचे स्रोत कमी झालेले आहेत. यामुळे जनावरांच्या चारा, पाण्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेतले. परंतु, वातावरणातील

चारा डेपो सुरु करण्याची मागणी

• हस्तपोखरी परिसरातील धनगर पिपरी प्रकल्पात दरवर्षी उन्हाळ्यातदेखील पाणी उपलब्ध असते.

● परंतु यंदा प्रकल्पात पाणी शिल्लक नसल्याने चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे परिसरात हिरवा चारा उपलब्ध नाही.

* त्यामुळे जनावरे उपाशी मरण्यापेक्षा कमी भावात विकलेली परवडतात, असे पशुपालक सांगत आहेत. शासनाने पशुधनासाठी चारा डेपोची उभारणी करावी, अशी मागणी रमेश वाघ यांनी केली आहे.

बदलामुळे ज्वारीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे ज्वारीचे पीक काळवंडले आहे. परिणामी हा कडबा जनावरे खात नसल्याने दिसत आहे. हिरवा चाऱ्याची बाजारपेठेत विक्री होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे जनावरांचे संगोपन कसे करावे, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. विहिरींनी तळ गाठल्याने शेतात हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याचे परिसरातील पशुपालक सांगत आहेत.

टॅग्स :दुग्धव्यवसायपाणीकपात