Join us

दुष्काळाचा वाढतोय डर चारापिके लागवडीवर देऊया भर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 3:35 PM

मका पिकाचा मुरघास बनवून चारा म्हणून वापर पशुपालन करत असतात, चारा लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी, भर उन्हाळ्यामध्ये चाराटंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे.

पोपटराव मुळीकलासूर्णे: यंदाच्या वर्षी पावसाच्या अत्यंत अल्प प्रमाणामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसंगावधान दाखवत शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यात विक्रमी ५५ हजार हेक्टरच्या वरती क्षेत्रावर चारा पिकांची लागवड केली आहे.

यामध्ये खास करून मका, कडवळ, तर नेपियर ग्रास आदी पिकांचा समावेश आहे. मका पिकाचा मुरघास बनवून चारा म्हणून वापर पशुपालन करत असतात, चारा लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी, भर उन्हाळ्यामध्ये चाराटंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे.

शेतकऱ्यांना यंदा पाण्याची कमतरता लक्षात घेत उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये, म्हणून रब्बी हंगामात चारा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. त्यामुळे चारा पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार असून, उन्हाळ्यात भासणारी चाराटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

कधीकाळी शेतीला जोडधंदा असणारा दुग्ध व्यवसाय आता अनेक शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय झाला आहे त्यामुळे सहाजीकच शेतकऱ्यांकडून चाऱ्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते, संकरित गाई, म्हशी अशा दुधाळ जनावरांना योग्य प्रमाणात चारा देणे आवश्यक असते.

अशावेळी चारा वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून अनेक शेतकरी हिरवा चाऱ्यासाठी मका, कडवळ, बाजरीची पेरणी तर नेपियर ग्रास, अशा विविध चारा पिकांची लागवड करतात, त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्याटप्प्याने उपलब्ध होतो.

मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे हिरव्या चाऱ्याचे क्षेत्र मर्यादित राहणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कडवळ मका आदी पिकांपासून मुरघास करण्याकडे सध्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. याशिवाय साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी उसाच्या वाड्याचा वापर चारा म्हणून करतात.

गुंठा पद्धतीने पीक खरेदी- वाड्याचे दर वाढल्यामुळे पशुपालकांच्या खिशाला झळ बसत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन नाही अशा शेतकऱ्यांनी देखील चारा पिकाच्या लागवडी केल्या आहेत. अगदी दोन अडीच महिन्यांमध्ये पीक निघून जाते. परिसरातील पशुपालक गुंठा पद्धतीने या पीक खरेदी करतात.- हिरवा चारा पशुधनाला उपलब्ध होत असल्याने सध्या अशा चाऱ्याला मोठी मागणी आहे. यामध्ये मका-कडवळ आदी पिकांच्या लागवडी काही शेतकरी करत आहेत. पशुपालक हिरव्या मक्याची विक्री न करता त्यापासून मुरघास बनवत आहेत.एकरी सुमारे १५ ते १८ टन हिरवा मका उपलब्ध होतो. मुरघास तयार करण्यासाठी मजूर टनाला एक हजार रुपये घेतात परंतु हा तयार झालेला मुरघास चाऱ्याची चिंता मिटवण्यास मदत करतो.

मुरघास साडेपाच हजार रुपये टन- हिरवा मका गुंठा १ हजार ७०० ते २ हजार रुपये दराने विकला जात आहे. कडवळ सुमारे दोन हजार गुंठा दराने विकला जात आहे. तर तयार मुरघास तब्बल साडेपाच हजार रुपये टनाने विकला जात आहे.ज्या पशुपालकांकडे क्षेत्र आहे असे पशुपालक हिरव्या मक्याची विक्री न करता त्यापासून मुरघास बनवत आहेत. एकरी सुमारे १५ ते १८ टन हिरवा मका उपलब्ध होतो.मुरघास तयार करण्यासाठी मजूर टनाला एक हजार रुपये घेतात परंतु हा तयार झालेला मुरघास पशुपालकांची काही दिवसाची चाऱ्याची चिंता मिटवतो.

मागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे यावर्षी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर उद्‌भवणार आहे. यासाठी आतापासूनच मुरघास बनवणे तसेच नेपियर या वाणाचा घास जनावरांसाठी चारा म्हणून उपयुक्त असल्याने याची लागवड जास्त प्रमाणात केली आहे. - सुधीर पवार, मुरघास व्यावसायिक बेलवाडी

टॅग्स :दुग्धव्यवसायगायमकादूधदुष्काळपाणीपीकपुणेशेतकरीपाऊस