पावसाळा सुरू झाल्याने आता हिरवा चारा मुबलक झाला आहे. पण, आपल्या दुभत्या जनावरांना आहार कोणता व किती प्रमाणात देतो, याविषयी बहुतांशी दूध उत्पादक शेतकरी अनभिज्ञ आहेत. ज्या आहारातून शरीरपोषण व दुग्धोपादनासाठी आवश्यक अन्नद्रव्ये पाचक स्वरूपात मिळतात व भूक भागते त्या आहारास 'समतोल आहार' असे म्हणतात.
समतोल आहार दिला तरच दूधवाढीला तो आधार ठरतो. हिरव्या चाऱ्यात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे आणि जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात असतात. हा चारा चिकाच्या किंवा फुलोऱ्यात असताना जनावरांना खायला द्यावा, अशा चाऱ्यातून जास्तीत जास्त अन्नघटक मिळाल्याने दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.
वैरणीबरोबर हाही सकस आहार द्याहिरवा चारा जसे घास, हिरवा मका, गवत, उसाचे वाढे या खाद्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. त्याचबरोबर साखर काढल्यानंतरची मळी, तेल काढल्यानंतरची पेंड, भरडा यांमध्ये अन्नघटक (प्रथिने) व ऊर्जा जास्त प्रमाण असणारे खाद्य दिले तर दुधाच्या उत्पादनावर चांगला परिणाम होतो. तसेच विशिष्ट प्रथिने, जीवनसत्त्वे असलेल्या खाद्यान्नामुळे जनावरांची प्रकृती सुधारते व स्वास्थ्य चांगले राहते.
वाळलेला चारा पौष्टिक करा■ ओल्या वैरणीची कमतरता भासते. पावसाळा सुरू होऊन ओली वैरण येईपर्यंत वैरणीचा प्रश्न भेडसावतो. यासाठी वाळलेले डोंगरी गवत, भाताचा पेंढा किंवा गव्हाचे काड कापून साठवून ठेवले जातात.■ या वाळलेल्या गवतात पोषकतत्त्वे कमी प्रमाणात असतात. यासाठी चाऱ्याला युरिया, मीठ, मिनरल मिक्शर, व गूळ याची प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढू शकते. हिरवा चार उपलब्ध नसेल अशावेळी पुरेसा पौष्टिक चारा मिळू शकतो.
दुग्धोपादनासाठी खाद्याची गरज दहा लिटर दूध देणाऱ्या जनावरांसाठी■ ६-८ किलो वाळलेला चारा.■ २५ किलो हिरवा चारा.■ ५-६ किलो खुराक खाद्य.■ वाळलेला व हिरव्या चाऱ्याची कुट्टी केल्यास २५ टक्के खाद्याची बचत होते.■ वजनाच्या २ ते २.५ टक्के वाळलेला चारा द्यावा.■ वाळलेला व हिरव्या चाऱ्याची कुट्टी केल्यास २५ टक्के खाद्याची बचत होते.
अधिक वाचा: पावसाळ्यात जनावरांचे व्यवस्थापन करण्यासाठी राबवा हा चारसूत्री कार्यक्रम