यंदा अपूऱ्या पावसाने राज्यात चारा टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. निम्म्याहून अधिक राज्य दुष्काळाचा सामना करत आहे. धरणसाठ्यातील पाणी निम्म्यावर आले आहे. मराठवाड्यातील विहिरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. पीकांचे नुकसान, चाऱ्याचे घटलेले क्षेत्र लक्षात घेऊन पशूसंवर्धन विभागाने चाराटंचाईवर उपाययोजना सूचवण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदलाची स्थापना केली आहे.
राज्यातील चारा लागवड क्षेत्रात झालेली घट, पशूधनाची संख्या व उत्पादित होणारा चारा विचारात घेता यात सामान्य पर्जन्यमानाच्या स्थितीत असलेल्या तूटीत टंचाईच्या काळात भर पडते. यावर उपाययोजना सूचवण्यासाठी पाच सदस्यांचे राज्यस्तरीय कृतीदल स्थापन करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
हिरव्या चाऱ्याची ४४ टक्के तूट
राज्यातल्या पधुधन जगवण्यास वार्षिक १ हजार ३३४.१३ लक्ष मे.टन ऐवढ्या हिरव्या चारा लागतो. तसेच ४२५.७७ मे. टन वाळलेला चारा लागतो. राज्यात यंदा केवळ ७४७.३७ मे. टन हिरवा चारा व ३२१.०५ मे. टन वाळलेला चारा शिल्लक आहे. हिरव्या चाऱ्याची ४३ टक्क्यांहून अधिक चारा तूट तर वाळलेल्या वैरणीची २५.१२ टक्के तूट यंदा निर्माण झाली आहे.
चारा लागवड क्षेत्रात घट
- राज्यातील चाऱ्याची कमतरता कमी करण्यासाठी पशूधनास पुरेसा, सकस व समतोल चारा उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- राज्यात सध्या अंमलात असलेल्या केंद्र व राज्य शासनांच्या योजनाचा आढावा घेणे व चाऱ्याची तूट भरून काढणे आवश्यक आहे.
- पशूसंवर्धन विभागाविभागासह महसूल, ग्रामविकास व कृषीविभागासह पाच सदस्यांचे स्थापन करण्यात आलेले राज्यस्तरीय कृतीदल निधीचे स्त्रोत शोधण्याबरोबर नवीन योजना तयार करण्यासाठी उपाययोजना सूचवणार आहे.
महाराष्ट्राची पशुधन उत्पादन क्षमता पंजाबपेक्षा दुपटीने कमी
- राज्यातील दुधाळ पशुधनाच्या उत्पादकतेत व देशाच्या दुध उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या पंजाब राज्यातील पशुधनाच्या तुलनेत राज्यातील पशूधन उत्पादकता पंजाब राज्यापेक्षा दूपटीने कमी आहे.
- देशाच्या व देशातील उत्पादनात अग्रेसर असलेल्या पंजाब राज्यातील पशुधनाच्या दुध उत्पादकतेबाबतची तुलनत्मक स्थिती लक्षात घेतली तर पंजाबमधील देशी गायी प्रतिदिन ९.१७ लिटर दुध देत असेल तर महाराष्ट्रातील देशी गायी २.३४ लिटर दुध प्रतिदिन देतात.