सर्वत्र सध्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यातून पशुधंनाला लम्पी सारख्या संसर्गजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्याकडील पशुधनाला वेळीच प्रतिबंधात्मक लम्पी लसीकरण करून घ्यावे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ डोंगरकडा कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांतील सर्व पशुपालकांनी पशुधनास लम्पी आजाराचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. बापूसाहेब बोरकर यांनी केले आहे.
पशुवैद्यकीय दवाखाना डोंगरकडा श्रेणी १ या शासकीय संस्थेत लम्पी चर्मरोग आजाराची प्रतिबंधात्मक लस पशुसंवर्धन विभाग पंचायत समितीमार्फत ४ डोस उपलब्ध झाले आहेत. तेव्हा गावातील पशुपालकांनी आपल्याकडे असलेल्या गाय, गोन्हा, कालवड, बैल, लम्पी किंवा चर्मरोग हा आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन केले आहे.
डोंगरकडा अंतर्गत हिरवा तर्फे जवळा, वरुड, वरुडतांडा, भाटेगाव, झुंजूनवाडी, देववाडी, चिंचवाडी, सुकळीवीर, जवळा पांचाळ, रेडगाव, वडगाव आदी गावांतील पशुधन मालकाने आपले पशुधन निरोगी व स्वस्त राहण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, अशी माहिती पशुधन विकासाधिकाऱ्यांनी दिली आहे.