चंद्रकांत औटी
पशुपालक घरगुती क्षेत्रात मक्याचे उत्पन्न घेताना दिसत आहे. मुरघास चाऱ्यासाठी शेतकरी आपले मक्याचे उभे पिकच विक्री करीत आहे. ग्रामीण भागामध्ये मुरघास तयार करण्यासाठीचे मशीन, ट्रॅक्टरचा संपूर्ण सेटच अनेक जणांनी विकत घेतला आहे. मुरघास तयार करण्याचा व्यवसायही सध्या तेजीत आहे. यामुळेच ग्रामीण भागात रोजगार देखील मोठ्याप्रमाणात निर्माण होत आहे.
जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात शेतकरी वर्ग दुग्ध व्यवसायात आहे घरची शेती तसेच जु मुचलक मनुष्यबळ यामुळे हा व्यवसाय चांगल्याप्रकारे वाढ झाली. दूध व्यवसायातून प्रत्येक दहा दिवस किवा महिन्याला दुधाचे पैसे मिळत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार सर्वस्वी या व्यवसायावरच अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे. तरकारी, कांदा, डाळींब, टोमॅटो यामध्ये बाजारभावानुसार चढ-उतार होत असतात. यावेळेस आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकरी वर्गाला दुग्धव्यवसायाचा मोठा हातभार लागत असतो. परंतु गेल्या काही वर्षापासून पशुखाद्य, वैरण, कडबा, मका यांचे बाजार वाढले. परंतु दूध दरामध्ये म्हणावी तशी वाढ होताना दिसत नाही, यामुळे पशुपालकाचे बजेट कोलमडते.
दूध व्यवसायासाठी संकरित गायींचे संगोपन मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहेत. दुग्धोत्पादन खर्च कमी करण्यासाठी पशुपालक सध्या जनावरांना चाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात मुरघास तयार करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे तालुक्यातील पूर्व भागात खूप मोठ्याप्रमाणात पशुधन आहे. विशेषतः जर्सी गाईची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळेच सध्या पशुपालक या जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मकेचा मुरघास तयार करून तो साठवणूक करताना दिसून येत आहे या मक्याच्या मुरघासमुळे वर्षभर जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळू लागला आहे. त्याचबरोबर या मुरघास वापरल्यामुळे जनावरांचे दूधही वाढल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे.
सर्व हिरव्या चाऱ्याचा मुरघास तयार करता येतो. तृणधान्य वर्गात मका, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश होतो, ज्वारी आणि मका तर उत्तमच परंतु उसाचे वाडे, नागली, बाजरी, गिनी गवत, हत्तीगवत, पॅरा गवत इत्यादी चारा पिकापासून ही चांगला मुरघास तयार करता येतो. चारा पिकाची कापणी करताना त्यातील पाण्याचे प्रमाण ६५ ते ७० टक्के असावे. - शुभम कोरडे, पशुपालक
चिकातला मक्यापासून बनवलेला, ज्यामध्ये जनावरांसाठी सर्व पोषक घटक जास्त आहेत. दुभत्या जनावरांना अधिक दूध निर्मितीसाठी गुणकारी आहेत तसेच जनावरे वेळेवर गाभण राहायला मदत करतो आणि प्रकृती सुधारते. इतर खाद्य जैसे की, (सरकी पेंड, सुग्रास, भरडा) हे कमी लागते व यामुळे आपला दुधाचा नफा वाढतो.
- सुनील औटी, पशुपालक