Join us

Goat Farming Disease :  'हा' आजार झाल्यास शेळी गेलीच म्हणून समजा, जाणून घ्या या आजाराबद्दल... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 17:03 IST

Goat Farming Disease : शेळ्यांमध्ये (Sheli Palan Aajar) फाशी आणि स्तनदाह हे दोन महत्वाचे आजार मानले जातात..

Goat Farming Disease :  शेळी व्यवसाय (Goat Farming) करताना शेतकऱ्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अन्यथा शेळ्यांना आजारांना सामोरे जावे लागते. यातून शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सोसावे लागते. यात फाशी आणि स्तनदाह हे दोन महत्वाचे आजार मानले जातात.. या आजारांची लक्षणे आणि उपाय काय करावेत? हे या लेखातून जाणून घेऊयात... 

शेळ्यांमध्ये फाशी (Goat Farming Disease) हा एक आजार आहे. हा आजार दूषित हवा किंवा वातावरणामुळे किंवा आजारी शेळी कळपात आणल्यामुळे होतो. या आजारात शेळ्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, तापमान वाढते आणि तोंडातून लाळ फेस येतो. 

फाशी : 

  • हा रोग बॅसिलस अॅन्द्रक्सीस या जीवाणूमुळे होतो. 
  • या रोगाची बाधा झाल्यावर कुठलीही दर्शनीय लक्षणे दिसून येत नाहीत. 
  • मात्र जनावर दगावल्यावर नाकातून, कानातून तसेच गुदद्वारावाटे रक्त येते व ते गोठत नाही. 
  • या रोगात जनावरे अचानक दगावत असल्यामुळे उपचारास वाव नाही. 
  • तरीपण या रोगाची ताप येणे, शेळी सुस्त होणे, हगवण लागणे व त्यानंतर १२-१४ तासात जनावर दगावणे, अशी लक्षणे दिसतात. 
  • अशावेळी प्रतिजैविकाचा उपयोग केल्यास शेळी वाचते. 

प्रतिबंधक उपाय म्हणून जनावरांना फाशीची लस टोचून घ्यावी व त्यानंतर दरवर्षी एकदा अशी सतत किमान तीन वर्षे लस टोचणी करावी.

शेळ्यांमधील स्तनदाह ही स्तन ग्रंथींची जळजळ असते. स्तनदाह होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की शारीरिक दुखापत, ताण, जीवाणू किंवा विषाणू. स्तनदाह होतल्यास शेळ्यांची उत्पादकता कमी होऊ शकतो. 

स्तनदाह : 

  • कासेमध्ये जीवाणूंचा शिरकाव झाल्यामुळे हा रोग होतो. 
  • कास दगडासारखी टणक होते. कासेला सूज येते व नी लालसर होते. 
  • सडातील दूध पातळ, गरम, लालसर येते. तसेच कधी त्यातून पू येतो. 
  • आतील दुधाच्या गाठी होऊन त्या सडाच्या तोंडाशी आल्यामुळे दूध काढता येत नाही. 
  • तेव्हा आतील दूध नासून अधिक आम्ल तयार होते, पर्यायाने पूर्ण कास निकामी होते. 

 

उपाय : 

  • रोगग्रस्त शेळयांचे दूध पूर्णपणे काढून कास मोकळी करावी. 
  • सडास प्रतिजैविकाची टयूब सोडावी. 
  • कासेवरील सूज कमी होण्यासाठी मलम चोळणे. 
  • दूध काढण्यापूर्वी कास नेहमी निर्जंतुक करणे असे उपचार करावेत.

 

- डॉ. सचिन टेकाडे, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक 

टॅग्स :शेळीपालनशेतीशेती क्षेत्रदुग्धव्यवसाय