Join us

'गोकुळ'ने केली कार्यक्षेत्राबाहेरील म्हैस, गाय दूध खरेदी दरात कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 3:54 PM

गोकुळने कार्यक्षेत्राबाहेरील म्हैस व गाय दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैस दुधाचे प्रतवारीनुसार प्रतिलिटर २ व ३ रुपये, तर गाय दुधाचे ४.५० रुपये कमी केले आहेत. त्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासूनच केली जाणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) कार्यक्षेत्राबाहेरील म्हैस व गायदूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैस दुधाचे प्रतवारीनुसार प्रतिलिटर २ व ३ रुपये, तर गाय दुधाचे ४.५० रुपये कमी केले आहेत. त्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासूनच केली जाणार आहे.

गाय दुधाचे उत्पादन अधिक आणि मागणी नसल्याने राज्यातील दूध संघांना मोठ्या प्रमाणात पावडर करावी लागत आहे. पावडरला दर नसल्याने संघाचे नुकसान होत असल्याने खासगी दूध संघांनी यापूर्वीच दर कमी केले आहेत.

गोकुळ'ने प्रतिलिटर ३३ रुपयांनी खरेदी सुरू ठेवली होती. मात्र, नुकसान होऊ लागल्याने कार्यक्षेत्राबाहेरील गाय दुधाचा दर प्रतिलिटर साडेचार रुपयांनी कमी केला आहे. म्हैस दुधाच्या दरातही कपात केली आहे.

परजिल्ह्यांतून अडीच लाख लिटर संकलन'गोकुळ' कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सोलापूर व बेळगाव जिल्ह्यांतून दूध संकलन केले जाते. सध्या रोज १८ लाख लिटर दूध संकलन आहे. त्यापैकी परजिल्ह्यातील सुमारे अडीच लाख लिटर गाय व म्हैस दूध आहे.

कसा राहणार दूध खरेदी दर..

दूधफॅटजुना दरनवीन दर
म्हैस५.५ ते ६.९५०.५० रुपये४७.५० रुपये
म्हैस७.० च्या पुढे५५.५० रुपये५३.५० रुपये
गाय३.५ (८.५ एस.एन.एफ.)३३ रुपये२८.५० रुपये
टॅग्स :गोकुळकोल्हापूरशेतकरीगायदूधदुग्धव्यवसाय