Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Gokul Dudh Dar : तब्बल पावणेदोन वर्षांनी 'गोकुळ'च्या दूध खरेदी दरात होतेय वाढ; वाचा सविस्तर

Gokul Dudh Dar : तब्बल पावणेदोन वर्षांनी 'गोकुळ'च्या दूध खरेदी दरात होतेय वाढ; वाचा सविस्तर

Gokul Dudh Dar : Is the purchase price of 'Gokul' milk increasing after two and a half years; Read in detail | Gokul Dudh Dar : तब्बल पावणेदोन वर्षांनी 'गोकुळ'च्या दूध खरेदी दरात होतेय वाढ; वाचा सविस्तर

Gokul Dudh Dar : तब्बल पावणेदोन वर्षांनी 'गोकुळ'च्या दूध खरेदी दरात होतेय वाढ; वाचा सविस्तर

कडक उन्हाळा, त्यात दुधाची वाढलेली मागणी आणि राज्यातील खासगी दूध संघांनी खरेदी दरात केलेली वाढ पाहून, 'गोकुळ'ने गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कडक उन्हाळा, त्यात दुधाची वाढलेली मागणी आणि राज्यातील खासगी दूध संघांनी खरेदी दरात केलेली वाढ पाहून, 'गोकुळ'ने गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : कडक उन्हाळा, त्यात दुधाची वाढलेली मागणी आणि राज्यातील खासगी दूध संघांनी खरेदी दरात केलेली वाढ पाहून, 'गोकुळ'नेगाय व म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे विक्री दरातही तातडीने वाढ केली जाणार असून, बुधवारी मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.

दूध संघांनी ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ. साठी प्रतिलिटर २८ रुपयांपर्यंत दर आणला होता. त्यामुळे दूध उत्पादकांची कोंडी झाली होती.

गेल्या महिन्याभरापासून दुधाची मागणी वाढल्याने राज्यातील खासगी दूध संघांनी प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 'गोकुळ' दूध संघाने खरेदी दरात वाढ न केल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती.

दोन रुपये वाढ दिल्यास गायीच्या ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ. साठी ३२, तर म्हशीच्या ६.० फॅट व ९.० एस. एन. एफ. साठी ५२.५० रुपये मिळू शकतात.

गाय दूध खरेदी दरात कपात
१ ऑगस्ट २०२३ - २ रुपये
१ ऑक्टोबर २०२३ - २ रुपये
२१ ऑक्टोबर २०२४ - ३ रुपये

कपात सातची, वाढ २ रु.ची
'गोकुळ'ने ऑगस्ट २०२३ पासून प्रतिलिटर सात रुपयांची कपात केली होती. तब्बल पावणेदोन वर्षांनी संघाने दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दूध पावडर, बटरही वधारली
-
महाराष्ट्रात गाय दूध पावडर मोठ्या प्रमाणात तयार केली जाते.
- मात्र, गेल्या वर्षभरापासून गाय दूध पावडर व बटरच्या दरात मोठी घसरण झाल्याने दूध संघांनी खरेदी दरात कपात केली होती.
- पण, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गाय पावडर व बटरचे दर वधारले आहेत.
- पावडरच्या दरात प्रतिकिलो तीस ते चाळीस रुपयांची वाढ झाली आहे.

'अमूल'चे दोन लाख लिटर संकलन
-
महाराष्ट्रातील विशेषता पश्चिम महाराष्ट्रातील म्हैस दुधाला मुंबईसह मोठ्या बाजारपेठेत मागणी आहे.
- पण, 'अमूल'कडे बहुतांशी गायीचे दूध असल्याने त्यांना मुंबई बाजारपेठेत 'गोकुळ'ला रोखता आलेले नाही.
- त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षापासून 'अमूल'ने पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांतील म्हैस दुधाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
- सध्या कोल्हापूर जिल्ह्यातून म्हैस व गायीचे प्रतिदिन दोन लाख लिटर दूध संकलन ते करत आहेत.

अधिक वाचा: सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सुरु करणार हे दोन उपक्रम

Web Title: Gokul Dudh Dar : Is the purchase price of 'Gokul' milk increasing after two and a half years; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.