Join us

Gokul Milk : गोकुळ सभासदत्वासाठी ५० लिटरची अट झाली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 11:10 AM

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) सभासदत्व कायम राहण्यासाठी प्रतिदिनी किमान ५० लिटर दूध पाठवण्याची अट रद्द केली आहे. आता दूध पुरवठा सुरू ठेवणे मात्र बंधनकारक राहणार आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) सभासदत्व कायम राहण्यासाठी प्रतिदिनी किमान ५० लिटर दूध पाठवण्याची अट रद्द केली आहे. आता दूध पुरवठा सुरू ठेवणे मात्र बंधनकारक राहणार आहे.

संघाचा पोटनियम दुरुस्ती सर्वसाधारण सभेपुढे ठेवली असून जिल्ह्यातील कमी दूध संकलन असणाऱ्या संस्थांना दिलासा मिळाला आहे. अहवालाचे पारंपरिक मुखपृष्ठात संघाने बदल केला असून पूर्वी वेळ मोजण्याचे वापरले जाणारे वाळूचे घड्याळाच्या चित्रा 'सकस ओला-सुका चारा द्या आणि मुबलक दूध घ्या' ही संकल्पना मांडली आहे.

'गोकुळ' दूध संघाची ६२ वा वार्षिक सर्वसाधारण सभा ३० ऑगस्टला दुपारी एक वाजता पंचतारांकित पशुखाद्य कारखाना कार्यस्थळावर होत आहे. विषयपत्रिकेवर सॅटेलाईट डेअरी उदगाव लगतची जागा खरेदी करणे, पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करणे आदी विषयांचा समावेश आहे.

पशुखाद्य विभागाला ५१.४० लाखांचा नफा संघाच्या पशुखाद्य कारखान्यातून आर्थिक वर्षात १ लाख ३९ हजार २१० टन उत्पादन झाले आहे. मागील आर्थिक वर्षात १ लाख ८६ हजार ६२६ रुपये नफा झाला होता, मात्र या वर्षात ५१ लाख ४० हजार ८०७ रुपये झाला आहे.

अशी झाली उलाढालीत वाढ• दूध खरेदी, वस्तू, सेवाप्रीत्यर्थ अदा केलेली रक्कम : २९६५ कोटी ९९ लाख ९८ हजार• बाहेरील दूध खरेदी : १९८ कोटी ५४ लाख ५० हजार• संकलन, पशुखाद्य व दुग्धशाळा खर्च : २७९ कोटी ९७ लाख ४७ हजार• सेवक वर्ग खर्च : १७३ कोटी ९० लाख ४५ हजार• व्यवस्थापन व वितरण खर्च : ३५ कोटी ८७ लाख ७४ हजार• घसारा : १३ कोटी २४ लाख १६ हजार• निव्वळ व्याज : १४ कोटी ३४ लाख २७ हजार• निव्वळ नफा : ११ कोटी ६६ लाख ९७ हजार

टॅग्स :गोकुळदूधशेतकरीदुग्धव्यवसायकोल्हापूर