Join us

Gokul Milk : कोजागरी निमित्त गोकुळने डेअरीने केली उच्चांकी दूध विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:37 AM

कोजागरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'ने बुधवारी दूध विक्रीचा नवा उच्चांक केला आहे. तब्बल १८ लाख ६५ हजार लिटर्सची दूध विक्री झाली.

कोल्हापूर : कोजागरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'ने बुधवारी दूध विक्रीचा नवा उच्चांक केला आहे. तब्बल १८ लाख ६५ हजार लिटर्सची दूध विक्री झाली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ८३ हजार ७७४ लिटरने विक्रीत वाढ झाली आहे. यासाठी संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा सत्कार कर्मचाऱ्यांनी केला.

अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, दिवाळी सणामध्ये तूप, श्रीखंड, बासुंदी, पनीर, लोणी, पेढा यांसारख्या उपपदार्थाची मागणी वाढत असून, त्याच्या विक्रीचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांनी ताकदीने पूर्ण करावे.

आपल्या गुणवत्तेच्या बळावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून, दूध संकलनात रोज वाढ होत आहे. आगामी काळात २० लाख लिटर्सचा टप्पा पूर्ण करायचा आहे.

यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, वरिष्ठ अधिकारी डॉ. एम. पी. पाटील, बाजीराव मुडकशीवाले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :गोकुळदूधदूध पुरवठादुग्धव्यवसायकोल्हापूरकोजागिरी