Join us

Gokul Milk गोकुळ सुरु करणार हा नवा प्रकल्प, वाचणार इतकी वीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:44 AM

'गोकुळ' दूध संघाच्या 'सोलर ओपन अॅक्सेस स्कीम' अंतर्गत करमाळा (जि. सोलापूर) येथे ६.५ मेगा व्हॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन संचालक अजित नरके व अभिजित तायशेटे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोल्हापूर : 'गोकुळ'दूध संघाच्या 'सोलर ओपन अॅक्सेस स्कीम' अंतर्गत करमाळा (जि. सोलापूर) येथे ६.५ मेगा व्हॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन संचालक अजित नरके व अभिजित तायशेटे यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्जन रिअॅलिटीज प्रा. लि. पुणे यांच्या करमाळा येथील सोलर पार्क येथे दूध संघाने खरेदी केलेल्या १८ एकर जागेत हा प्रकल्प होत आहे. संचालक अजित नरके म्हणाले, गोकुळ मुख्यालयाकडील वर्षाकाठी जवळजवळ वीज बिलाचा खर्च १३ कोटी इतका येतो.

हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरले आहे. यावेळी संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक प्रताप पडवळ, सहायक व्यवस्थापक इलेक्ट्रिकल ए. आर. कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, राजेश बांदल, सतीश व्यवहारे उपस्थित होते.

सौरऊर्जा प्रकल्पऑगस्ट २०२४ प्रकल्पातून प्रत्यक्षात वीजनिर्मिती३३.३३ कोटी प्रकल्पाचा जागेसह खर्च६,५० कोटी 'गोकुळ'ची वीज बचत, प्रतिवर्षी

अधिक वाचा: Animal Ear Tagging हे करा.. नाहीतर पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून प्रतिबंध

टॅग्स :गोकुळसोलापूरदूधवीजकोल्हापूर