Join us

लातूर जिल्ह्यात पशुरोग निदान प्रयोगशाळेस शासनाची मान्यता

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 24, 2023 1:36 PM

सध्या राज्यामध्ये लातूर विभाग वगळता नागपूर, अकोला,औरंगाबाद, नाशिक, पुणे,कोल्हापूर व चिपळूण अशा ७ ठिकाणी पशुरोग निदान प्रयोगशाळा आहेत.

 शेतकरी पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लातूर विभागात विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.  या प्रयोगशाळेसाठी २ कोटी ५१ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली असून एकूण ११ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

लातूर विभागामध्ये  गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या व कोंबड्या यांची लक्षणीय संख्या आहे.  या विभागासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा नसल्याने जिल्ह्यातील पशुपालकांना रोग नमुने तपासणीसाठी औरंगाबाद किंवा पुण्यातील दूरच्या प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत होते. ही प्रयोगशाळा झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन त्यांचे आर्थिक नुकसानही टळणार आहे. सध्या राज्यामध्ये लातूर विभाग वगळता नागपूर, अकोला,औरंगाबाद, नाशिक, पुणे,कोल्हापूर व चिपळूण अशा ७ ठिकाणी पशुरोग निदान प्रयोगशाळा आहेत.

लातूर विभागातील पशुपक्ष्यांमध्ये उद्भवणाऱ्या विविध संसर्गिक रोगांचे निदान करण्यासाठी तसेच पशुपालकांना व पशुवैद्यकांना मार्गदर्शन व प्रशिक्षणही यात देण्यात येणार आहे. हा निर्णय  13 जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली असून आज त्याला शासनाची मंजुरी मिळाली आहे.

लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश असून या पशूनिदान प्रयोगशाळेमुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. लातूर विभागात प्रयोगशाळा स्थापन केल्यास, उच्च दर्जाची अत्याधुनिक पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होऊन रोग  निदान जलदगतीने व वेळेत होईल. यामुळे पशुधन व पक्ष्यांमध्ये  होणाऱ्या रोग प्रादुभावावर नियंत्रण ठेवता येईल.

टॅग्स :दुग्धव्यवसायलातूरशेती क्षेत्रशेतकरीसरकार