Join us

Green Fodder Management मक्याचे दाणे भिजवा; जनावर तगडं बनवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 11:30 AM

पावसाळ्याच्या तोंडी दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. अशावेळी 'हायड्रोफोनिक' पद्धतीने कमी पाणी, कमी जागा व कमी वेळेत सकस चारानिर्मिती केली जाऊ शकते.

पावसाळ्याच्या तोंडी दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. 'हायड्रोफोनिक' पद्धतीने कमी पाणी, कमी जागा व कमी वेळेत सकस चारानिर्मिती केली जाऊ शकते. हिरव्या चाऱ्याला पर्याय म्हणून ग्रामीण भागातील काही पशुपालक या मक्याचे दाणे भिजवून हायड्रोफोनिक पद्धतीने चारा निर्मिती करण्यास प्राधान्य देत आहेत.

पावसाचे आगमन, चारा उपलब्ध

जिल्ह्यात यंदा जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. आता पाऊस होत असला तरीही पावसाची तूट आहे. हिरवा चारा उपलब्ध होत असल्याने चाऱ्याचा प्रश्न काहीसा मिटला आहे.

हायड्रोफोनिक चारानिर्मिती तंत्र

चारा टंचाईवर मात करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांकडून हायड्रोफोनिक पद्धतीने चारा निर्मितीचे तंत्र अवलंबिले गेले आहे.

कसा बनवाल चारा

काही ठिकाणी तयार केलेल्या चारा पद्धतीनुसार, मक्याच्या दाण्यांना २४ तास भिजत ठेवा. २४ तासांनंतर हे दाणे गोणपाटात काढून घेतल्यानंतर त्याला मोड येतात. यानंतर मोड आलेले मक्याचे दाणे घरात सात ते आठ मातीच्या मोठ्या टोपल्या आणि प्लास्टिक ट्रे यात माती टाकून पेरून ठेवा. एका ठिकाणी ४०० ग्रॅम मका पेरून त्याला दररोज दर दोन तासाने पाणी द्यावे, यातून एका आठवड्यात हा चारा वाढून पुढे १२ दिवसांत त्याची संपूर्ण वाढ होईल. एका ट्रेमध्ये साधारण सहा किलोपेक्षा अधिक चारा उपलब्ध होईल.

वेळ, पाणी अन् जागेचीही बचत

या चाऱ्यामध्ये पौष्टिक प्रथिने कार्बोदके चवदार जीवनसत्त्व सूक्ष्म अन्नघटकांचे प्रमाण भरपूर आहे. कमी पाणी लागत असल्यामुळे हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरत आहे. यामुळे कमी जागेत कमी खर्चात सगळ्या प्रकारच्या हवामानात वर्षभर चारा उत्पादक करणे शक्य आहे.

भरडलेल्या धान्यापेक्षा पौष्टिक

दुभत्या जनावरांना चारा म्हणून भरडलेली धान्य मोठ्या प्रमाणात दिले जाते. मात्र, पशुपालकांनी शोधलेल्या हायड्रोफोनिक चारानिर्मिती तंत्राच्या माध्यमातून केली जाते.

शंभर टक्के सेंद्रिय, शेळ्यांनाही उपयोगी

चारा तयार करण्यासाठी कोणतेही रसायनिक खत किंवा औषध वापरले जात नसल्याने हा चारा १०० टक्के सेंद्रिय आहे. हा चारा शेळ्या आवडीने खात असून, यामुळे शेळीचे आरोग्य चांगले राहात आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला हिरवा चारा उपलब्ध होत नाही. चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुपालक दुभत्या पशुसांठी हायड्रोफोनिक चारा निर्मितीवर भर देत आहेत. - तृप्ती खेडेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा.

हेही वाचा - Detection of mastitis in bovines 'या' किटच्या मदतीने घरीच करा मस्टायटीसची तपासणी

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीशेती क्षेत्रदूधगायशेळीपालन