Join us

उन्हाचा कडाका: दुभत्या जनावरांची घ्या काळजी अन्यथा दूध उत्पादनासह...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 11:56 AM

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, जिल्हा चाळिशीच्या पार गेला आहे. उन्हाची दाहकता वाढल्यामुळे या काळात जनावरांची ...

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, जिल्हा चाळिशीच्या पार गेला आहे. उन्हाची दाहकता वाढल्यामुळे या काळात जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. यामुळे जनावरांना आजाराची लागण होण्याची शक्यता असते. पशुपालकांनी कडक उन्हात जनावरांना बांधू नये, उष्णतेमुळे गरम झालेले पाणी पशुधनास पाजणे टाळावे, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाकडून दिला जात आहे.

उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर याचा परिणाम दूध उत्पादनावर देखील होतो. बीड जिल्ह्यात एकूण १ लाख ९३ हजार ६१६ एवढी दुभती जनावरे आहेत. यामध्ये दुधातील गाई व म्हशींचा समावेश आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक १५ हजार १९४ दुभत्या गाई आहेत. तर केज तालुक्यात सर्वाधिक १४ हजार ४५७ म्हशी आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर दूध उत्पादनावर देखील परिणाम होतो. यामुळे जनावरांना उन्हापासून वाचण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर याचा परिणाम दूध उत्पादनावर देखील होतो. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे हिरव्या चाऱ्याची देखील जिल्ह्यात जिल्ह टंचाई आहे. त्यातच उन्हाची दाहकता वाढली असून, दूध उत्पादनावर परिणाम होत असल्याने पशुपालकांना नुकसान सहन करावे लागत आहे.

Temperature today: पुण्यात ४०.४, तुमच्या शहरात आज काय आहे तापमानाचा पारा?

बीड तालुक्यात सर्वाधिक १५ हजार दुभत्या गाई

या तालुक्यात सर्वाधिक १५ हजार १९४ दुभत्या गाई आहेत तर केज तालुक्यात सर्वाधिक १४ हजार ४५७ म्हशी आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर दूध उत्पादनावर याचा परिणाम होतो. यामुळे उन्हापासून बचावासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी.

दुभत्या जनावरांची घ्या अशी काळजी

दुभत्या जनावरांना उन्हाचा विपरित परिणाम होऊ नये, यासाठी पशुपालकांनी हवामान पूरक, सुधारित गोठे बांधावेत. गोठ्यात खेळती हवा राहावी, सूर्याची किरणे गोठ्यात परावर्तित व्हावीत, याची काळजी घ्यावी. छपरावर पालापाचोळा किवा उसाचे पाचट टाकावे. त्यामुळे गोठ्याचे छत गरम होणार नाही. जनावरांना शक्यतो सायंकाळी, सकाळीच चरण्यासाठी सोडावे. म्हशीच्या कातड्याचा काळा रंग असल्यामुळे त्यांच्यावर जास्त होऊन आकर्षित होते. तसेच ग्रामग्रंथीची संख्या कमी असल्यामुळे गाईंना जास्त ऊन लागते. यामुळे पशुपालकांनी दुभत्या जनावरांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :दुग्धव्यवसायतापमानहवामान