पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असतात. त्यामध्ये पाऊस, वातावरण, तापमान, साथीचे रोग इत्यादींचा सामना करावा लागतो. तर साथीच्या रोगांवर स्थानिक किंवा शासकीय डॉक्टरांकडून उपचार करता येतात. पण गोठा नियोजनातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोठ्यातील गोचीड, माशांचे व्यवस्थापन. यामुळे अनेक शेतकरी त्रासलेले असतात. तर गोचिडावर अनेक शेतकऱ्यांना अजूनही मात करता आली नाही.
दरम्यान, गोठ्यातील या त्रासामुळे दुग्धव्यवसाय, शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अनेक औषधे वापरूनसुद्धा यावर अनेकांना मात करता येत नाही. प्रसिद्ध पशुवैद्यकीय आणि पशुव्यवस्थापन सल्लागार डॉ. प्रशांत योगी यांनी यासंदर्भात घरगुती उपाय सांगितले असून त्यामध्ये शेतकऱ्यांना कमी खर्चात गोचीड आणि माशांसारख्या इतर किटकांवर मात करता येणार आहे.
गोठ्यात या किटकांचा त्रासकोणत्याही जनावरांच्या गोठ्यामध्ये डास, माशा, गोमाशा, उवा, लिखा, गोचीड या कीटकांचा त्रास होतो. या कीटकांमुळे साथीच्या रोगांना जनावरे बळी पडत असतात. तर गोचिडामुळे अनेक जनावरांच्या शरिरात सुधारणा होत नाही.
घरगुती उपायगोठ्यातील या किटकांचा त्रास कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी लिंबाचे तेल आणि करंज तेल उपयोगी पडते. गायीच्या, म्हशीच्या किंवा शेळीच्या अंगावर किंवा गोठ्यामध्ये आणि गोठ्याच्या चारही बाजूला १० फूट अंतर सोडून फवारणी केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात. त्याचबरोबर फ्लेमगन विकत घेऊन गोठा जाळला तर त्याचा जास्त पाहायला मिळतो.
(वरील उपाय करताना आपल्या जवळील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)