Join us

जनावरांमध्ये मिथेन वायू कसा तयार होतो व तो कसा शरीराबाहेर टाकला जातो?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 9:38 AM

जनावरांच्या कोठी पोटामध्ये जेव्हा चाऱ्याचे किण्वन पद्धतीने विघटन किंवा पचन सुरू होते, त्यावेळी अन्नपदार्थांमधील कर्बोदकांच्या विघटनादरम्यान 'हायड्रोजन' आणि 'कार्बन डाय- ऑक्साइड' हे वायू तयार होतात.

जनावरांच्या कोठी पोटामध्ये जेव्हा चाऱ्याचे किण्वन पद्धतीने विघटन किंवा पचन सुरू होते, त्यावेळी अन्नपदार्थांमधील कर्बोदकांच्या विघटनादरम्यान 'हायड्रोजन' आणि 'कार्बन डाय- ऑक्साइड' हे वायू तयार होतात.

यावेळी 'मेथानोजेन्स', 'मेथानोसारसीना' इत्यादी सूक्ष्मजीव मिथेनॉल आणि मिथिल अमाईनचा वापर करून हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साइड पासून मिथेन तयार करतात. एका प्रौढ गायीपासून एका वर्षाला सरासरी ९० ते १२० किलो मिथेन वायू उत्सर्जित केला जातो.

यामध्ये विदेशी आणि संकरित गायींपासून जास्त प्रमाणात मिथेन उत्सर्जित केला जातो व देशी गायींमध्ये मिथेन उत्सर्जनाचे प्रमाण कमी आहे. गायी, म्हशी, शेळी, मेंढी इत्यादी एकूण पशुधन संख्येच्या बाबतीत भारताचा जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो.

तसेच भारताचा जगामध्ये दूध उत्पादनातही प्रथम क्रमांक आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात असलेल्या पशुधनांमधून खूप मोठ्या प्रमाणात मिथेन वायूचे उत्सर्जन सुद्धा होत आहे.

हा मिथेन वायू 'हरितगृह परिणाम', 'जागतिक तापमान वाढ' व 'हवामान बदल' इत्यादींसारख्या गोष्टींसाठी कारणीभूत ठरत असतो. जनावरांमध्ये मिथेन उत्पादन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी अन्नपचन दरम्यान कोठी पोटामध्ये उद्भवते.

जनावरांमध्ये मिथेन वायू कसा तयार होतो? 

  • गायी-म्हशीं च्या पोटाचे चार भाग पडतात यामध्ये कोठी पोट (रुमेन), जाळी पोट (रेटीकुलम), पडदे पोट (ओमेझम), चौथे पोट (टू स्टमक) अशी यांची अनुक्रमे नावे आहेत.
  • यातील पहिल्या क्रमांकाचे जे कोटी पोट हे जवळजवळ एकूण पोटाच्या ८०% एवढे असते. त्यात सूक्ष्मजीवांच्या साह्याने म्हणजेच किण्वन प्रक्रियेने अन्नपदार्थांचे पचन केले जाते.
  • या प्रक्रियेत, 'मेथेनोजेन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक सूक्ष्म जीव प्रजाती प्रथिने आणि स्टार्च सारख्या खाद्याचे अमिनो अॅसिड आणि शर्करेमध्ये रूपांतर करतात जे नंतर अस्थिर फॅटी अॅसिड बनण्यासाठी आंबवले जातात.
  • मेथनोजेन, अॅसीटेट आणि ब्युटीरेट संश्लेषणादरम्यान तयार होणाऱ्या कार्बन डायऑक्साइड (CO₂) आणि आण्विक हायड्रोजन (H₂) चे मिथेन मध्ये रूपांतरित होते. ज्यामध्ये कार्बन डायऑक्साइड (CO₂) चा १ कण व हायड्रोजन (H₂) चे ४ कण मिळून मिथेन तयार होतो.
  • गायी-म्हशींच्या पोटामध्ये तयार होणाऱ्या एकूण मिथेन वायू पैकी जवळ-जवळ ९५% मिथेन वायू हा जनावरांच्या तोंडावाटे म्हणजेच 'ढेकर' क्रियेतून वातावरणामध्ये उत्सर्जित केला जातो व उर्वरित ५% हा जनावरांच्या मलमूत्रामार्फत वातावरणामध्ये उत्सर्जित होतो.

अधिक वाचा: शेती नसेल तरीही तुम्ही कमी वेळेत, कमी खर्चात घेऊ शकाल ह्या पौष्टीक चाऱ्याचे उत्पादन

टॅग्स :गायदुग्धव्यवसायदूधशेतकरीतापमानहवामान