Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > पशुपालकांसाठी महत्त्वाची माहिती; महाराष्ट्रात आहेत जनावरांचे इतके डॉक्टर

पशुपालकांसाठी महत्त्वाची माहिती; महाराष्ट्रात आहेत जनावरांचे इतके डॉक्टर

how many veterinary doctors are in Maharashtra? here is info | पशुपालकांसाठी महत्त्वाची माहिती; महाराष्ट्रात आहेत जनावरांचे इतके डॉक्टर

पशुपालकांसाठी महत्त्वाची माहिती; महाराष्ट्रात आहेत जनावरांचे इतके डॉक्टर

महाराष्ट्रात काही ठिकाणी पुरेसे जनावरांचे डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या पशुपालकांच्या तक्रारी असतात. मात्र केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने हा दावा खोडून काढला आहे.

महाराष्ट्रात काही ठिकाणी पुरेसे जनावरांचे डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या पशुपालकांच्या तक्रारी असतात. मात्र केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने हा दावा खोडून काढला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अनेकदा जनावरे आजारी पडली किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात काही समस्या निर्माण झाली की पशुपालक शेतकऱ्यांना तातडीने जनावरांच्या डॉक्टरांची आठवण येते. महाराष्ट्रात काही ठिकाणी पुरेसे जनावरांचे डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या पशुपालकांच्या तक्रारी असतात. मात्र केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने हा दावा खोडून काढला आहे. राज्यात पुरेसे पशुवैद्यक आहेत असे सरकारचे म्हणणे आहे. या संदर्भात संबंधित मंत्र्यांनी संसदेत निवेदनही दिले होते.

पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करण्याचे राज्यांना अधिकार असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. राज्य सरकारांनी/ राज्य विद्यापीठांनी सुरू केलेल्या/ चालवण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांना, पशुवैद्यकीय शिक्षणामध्ये उच्च गुणवत्ता टिकवण्याच्या उद्देशाने  केंद्र सरकारकडून भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने केलेल्या शिफारशींच्या आणि नियमांच्या आधारे मान्यता दिली जाते. तसेच भारतीय पशुवैद्यकीय परिषदेकडून शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खाजगी महाविद्यालयांवर देखील नियंत्रण ठेवले जाते.

दरम्यान भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात ३१ मार्च २३ पर्यंत 81,938 पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात 10,570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. 

पशुसंवर्धन हा राज्यांच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे आणि सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भरती राज्यांकडून आजाराच्या महामारी विज्ञानाच्या स्थितीनुसार आणि प्राण्यांच्या परिस्थितीनुसार निर्माण होणाऱ्या गरजांच्या आधारे केली जाते. राज्याकंडून मिळालेल्या माहितीनुसार काही राज्यांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या तुटवड्याचे प्रमाण बदलते आहे तर काही राज्यांमध्ये कोणताही तुटवडा नाही, असे केंद्र सरकारच्या संबंधित विभागाचे म्हणणे आहे.

देशातील कुठल्या राज्यात किती पशुवैद्यक आहे, त्याच्या तक्ता पुढीलप्रमाणे

राज्य

जनावरांचे डॉक्टर 

अंदमान व निकोबार

59

आंध्र प्रदेश

5324

अरुणाचल प्रदेश

232

आसाम

3154

बिहार

3464

छत्तीसगढ

1215

चंडीगढ

13

दादरा नगर हवेली

4

दीव व दमण

1

दिल्ली

466

गोवा

222

गुजरात

4447

हरियाणा

2372

हिमाचल प्रदेश

1402

झारखंड

927

कर्नाटक

4786

केरळ

5172

लक्ष्यद्वीप

34

मध्य प्रदेश

3039

महाराष्ट्र

10570

मणिपूर

561

मेघालय

433

मिझोराम

351

नागालँड

350

ओडिशा

2791

पुडूच्चेरी

535

पंजाब

4285

राजस्थान

4853

सिक्कीम

199

तामिळनाडू

6245

त्रिपुरा

451

उत्तर प्रदेश

6907

उत्तराखंड

1156

पश्चिम बंगाल

2661

तेलंगाणा

2124

जम्मू आणि कश्मिर

1057

लडाख

76

एकूण : 81938

Web Title: how many veterinary doctors are in Maharashtra? here is info

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.