Join us

उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी दिवसाला किती पाणी लागते? व ते कसे द्यावे? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 14:47 IST

प्राण्यांच्या शरीरातील एक दशांश पाणी कमी झाल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो यावरून पाण्याचे महत्त्व लक्षात येते. दूध देणाऱ्या प्राण्यांना जास्त पाणी लागते, कारण दुधामध्ये ८४ ते ८८% पाणी असते.

प्राण्यांच्या शरीरातील एक दशांश पाणी कमी झाल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो यावरून पाण्याचे महत्त्व लक्षात येते. दूध देणाऱ्या प्राण्यांना जास्त पाणी लागते, कारण दुधामध्ये ८४ ते ८८% पाणी असते.

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या लाळेमध्ये 'टायलीन' हे विकर नसते म्हणून अन्नपदार्थांचे पचन 'कोटी पोटामध्ये' (Rumen) सूक्ष्म जीवांच्या मदतीने किण्वन प्रक्रियेने केले जाते. त्यासाठी मोठ्याप्रमाणावर लाळेचा स्त्राव होणे गरजेचे असते.

अन्नपदार्थांचे किण्वन, पचन, आणि शोषण सुरळीत होण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता आहे. तहान लागल्यावर आपण पाणी मागू शकतो, पण प्राणी तसे करू शकत नाहीत! 

कोणत्या जनावराला किती पाणी?एका दुभत्या प्रौढ म्हशीला ६० ते ६५ लिटर पाणी प्रति दिवस व दुभत्या प्रौढ गाईला ४० ते ४५ लिटर पाणी प्रति दिवस फक्त पिण्यासाठी आवश्यक असते.दुभत्या जनावरांना एक लिटर दूध देण्यासाठी ३-५ लिटर पाणी लागते.- ताप किंवा अतिसार होत असल्यास तसेच उन्हाळ्यात त्यांना अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते.तसेच त्यांचे आरोग्य सुधारते आणि दुग्धोत्पादनात लक्षणीय वाढ होते.

पाण्याची गुणवत्ता व काळजी- जर पाणी चवीला चांगले असेल आणि आरामदायक तापमान असेल म्हणजे, खूप गरम किंवा थंड नसेल तर प्राणी ते अधिक पितात. जेव्हा पाण्याचे तापमान २५ अंश सेल्सिअस एवढे असते तेव्हा ते अधिक पाणी पितात. माणसांइतकेच स्वच्छ पाणी प्राण्यांना लागते.बांधलेल्या जनावरांना दिवसातून किमान ४ ते ५ वेळा पाणी द्यावे किंवा त्यांच्याजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवावे.पाणवठे नेहमी स्वच्छ असले पाहिजेत.त्यांना आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्यास त्यांचे खाद्य पूर्णपणे पचत नाही.त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन दूध उत्पादनात घट होते.

हे लक्षात ठेवा- जनावरांसाठी पाणी सतत उपलब्ध असावे.त्यांना नेहमी शुद्ध आणि ताजे पाणी द्यावे.पाणवठे रोज स्वच्छ करावेत.दोन महिन्यातून एकदा चुनखडीने गोठ्याला पांढरा रंग द्यावा.पाण्याचे तापमान वातावरणानुसार ठेवावे.जनावरांना एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यास त्यांना उन्हाळ्यात दिवसातून ५ वेळा आणि हिवाळ्यात दिवसातून किमान ३ वेळा पाणी द्यावे.जनावरांना दूध काढल्यानंतर पाणी दिले पाहिजे कारण जनावरांना त्यांच्या दैनंदिन वापरापैकी एक तृतीयांश पाणी दूध दिल्यानंतर आवश्यक असते.

अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांमध्ये येणारा ताण कमी करण्यासाठी करा ह्या १० गोष्टी; वाचा सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायगायपाणीदूधशेतकरीशेती