Join us

जनावरांमधील गोचीडांचे नियंत्रण कसे कराल?

By बिभिषण बागल | Published: August 01, 2023 11:00 AM

गोचीड जनावरांचे रक्तशोषण करते व त्यामुळे जनावरांस अशक्तपणा येतो तसेच गोचिडांपासून जनावरांना, बबेसियोसिस, थायलेरिओसिस या सारखे आजार होऊन जनावरे दगावतात व शेतकऱ्याला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागते.

जनावरांमध्ये आढळणारा विविध परजीवीपैकी गोचीड हा एक महत्वाचा बाह्य परजीवी आहे. बहुतेक सर्वच ऋतुमध्ये त्याचा प्रादुर्भाव आढळतो. उन्हाळ्यात गोचीड व त्यांची अंडी सुप्तावस्थेत असतात. परंतु पावसाळ्यातील दमट हवामानामुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसण्याची शक्यता असते.

गोचीड जनावरांचे रक्तशोषण करते व त्यामुळे जनावरांस अशक्तपणा येतो तसेच गोचिडांपासून जनावरांना, बबेसियोसिस, थायलेरिओसिस या सारखे आजार होऊन जनावरे दगावतात व शेतकऱ्याला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यासाठी आजारांचे निमुर्लन करण्यासाठी गोचीडांचा नायनाट करणे अत्यंत महत्वाचे आहे. पशुवैद्यकाच्या सल्याने वेळोवेळी जनावरांच्या अंगावरील गोचीडांचे तसेच जनावरांच्या गोठ्यातील गोचीडांचे निमुर्लन करावे.

गोचिड नियंत्रणात आणण्यासाठी उपाय१) बुरशीजन्य किटकनाशक-मेटारायझीयम बुरशीचे द्रावण : ५ ग्राम बुरशी पावडर + ५ मिली दुध + १ लिटर पाणी गोठ्यामध्ये (पशुधनाच्या अंगावर नाही) फवारल्यास बुरशी गोचीडाच्या अंड्यांना चिकटते व नाश करते.२) वनस्पतीजन्य किटकानाशक : १० मिली निमतेल + १० मिली करंज तेल + २० ग्रॅम अंगाच्या साबणाचा चुरा + १ लीटर पाणी हे द्रावण दोन तास भिजत ठेवुन तयार करावे, हे द्रावण गोठ्यामध्ये व जनावरांच्या शरीरावर फवारण्यासाठी वापरावे.

डॉ. विष्णु नरवडे, डॉ. दिलीप देवकर आणि डॉ. दिनकर कांबळे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

टॅग्स :दुग्धव्यवसायगायशेतकरीदूध