Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > FMD Disease पावसाळ्यात पशुधनातील लाळ्या खुरकूत रोखायचा कसा?

FMD Disease पावसाळ्यात पशुधनातील लाळ्या खुरकूत रोखायचा कसा?

How to prevent FMD Disease in livestock during rainy season? | FMD Disease पावसाळ्यात पशुधनातील लाळ्या खुरकूत रोखायचा कसा?

FMD Disease पावसाळ्यात पशुधनातील लाळ्या खुरकूत रोखायचा कसा?

FMD in livestock लाळ्या खुरकूत रोग अत्यंत वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या मेंढ्या यासह डुकरांमध्ये प्रामुख्याने आढळतो.

FMD in livestock लाळ्या खुरकूत रोग अत्यंत वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या मेंढ्या यासह डुकरांमध्ये प्रामुख्याने आढळतो.

शेअर :

Join us
Join usNext

लाळ्या खुरकूत रोग अत्यंत वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या मेंढ्या यासह डुकरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. या रोगामुळे दूध उत्पादनात घट, जनावरांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. 

बैलांच्या क्रयशक्तीवरही परिणाम होतो. सोबत लहान वासरे, रेडकं यांच्यात मोठ्या प्रमाणात मरतूक होत असल्यामुळे दोन-चार जनावरे असणाऱ्या पशुपालकांचे या रोगामुळे प्रचंड नुकसान होते. 

'पीकोर्ना हीरीडी' या वर्गातील 'अप्तो व्हायरस' या विषाणूमुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. यांचे ए, ओ, सी, अशिया १ व एस् टी १, २, ३ असे उपप्रकार आहेत. हा विषाणू सामान्य निर्जंतुकीकरण द्रावणाला दाद देत नाही. कमी तापमानात अनेक दिवस जिवंत राहतो.

प्रसार
- प्रसार प्रामुख्याने हवेमधून, दूध, शेण, लघवी, वीर्य, पाणी पिण्याच्या जागा, गोठ्यात वापरत असलेली भांडी यापासून जास्त होतो.
- त्याचबरोबर बाधित जनावरांचा संपर्क येऊ शकणाऱ्या जागा म्हणजे जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने, साखर कारखान्याचे हंगाम त्याचबरोबर स्थलांतरित पक्षीदेखील या रोगाचा प्रसार करू शकतात.
- बाधित जनावरांतील लाळ इतर सर्व स्रार्वातून या विषाणूचा प्रसार होतो.
- रोगाचा संक्रमण कालावधी दोन ते सहा दिवस काही वेळेला पंधरा दिवसांपर्यंत असतो.
- मरतुकीचे प्रमाणसुद्धा विषाणूच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
- २० टक्क्यापासून ते ५० टक्क्यांपर्यंत मरतूक होऊ शकते.
- या रोगाचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे काही ठिकाणी शंभर टक्के जनावरे बाधित होताना दिसतात.

प्रादुर्भाव त्या जनावरात होत नाही. पणा इतर प्रकारामुळे हा रोग होऊ शकतो याचाच अर्थ इतर उपप्रकारांसाठी ही रोगप्रतिकारशक्ती उपयुक्त ठरत नाही. विशेष म्हणजे नैसर्गिक प्रादुर्भावानंतर सुमारे एक वर्ष जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाची बाधा होत नाही. त्याचबरोबर या रोगात आयुष्यभरासाठी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होत नाही.

एखाद्या गावातील या रोगासाठीची रोगप्रतिकारशक्ती नष्ट झाल्यास त्या गावात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जर वारंवार एकाच गावात रोगाचा प्रादुर्भाव होता असेल तर एकापेक्षा अधिक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारांनी पशुधन बाधित होते, असे गृहित आहे.

स्वतःमध्ये बदला घडवून आणण्याच्या क्षमतेमुळे (उतपरिवर्तन) नवीन उपप्रकार तयार होतात, त्यांची रोगकारक क्षमता व तीव्रता वेगवेगळी असते. तथापि जनावरांतील लक्षणे मात्र एकसारखी असतात.

डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन

अधिक वाचा: PPR in Goat शेळ्या-मेंढ्या मधील पीपीआर रोग; लक्षणे आणि उपाययोजना

Web Title: How to prevent FMD Disease in livestock during rainy season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.