जनावरांच्या शरीर पोषणासाठी लागणाऱ्या पशुखाद्याव्यतिरिक्त गर्भाच्या वाढीसाठी व येणाऱ्या वेतात अपेक्षित दुध उत्पादन मिळण्याचे दृष्टीने शेवटच्या २ ते २.५ महिन्यात १ ते १.५ किलो जास्तीचा खुराक किंवा पशुखाद्य पुरवठा करावा.
पाणी पुरवठाउन्हाळ्यातील उन्हापासून होणारा उष्णतेचा त्रास कमी करणे, त्याचप्रमाणे अपेक्षित दूध उत्पादन मिळविण्याचे दृष्टीने जनावरांना भरपूर व स्वच्छ पाणी पुरवठा करणे आवश्यक असते. जनावरांना दिवसाकाठी तीन-चार वेळा पाणी प्यायला द्यावे. म्हशीमधे घामग्रंथीच्या अभावामुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळी दूध काढण्यापुर्वी म्हशींना आंघोळ घातल्यास अपेक्षित गुणप्रतिचे दुग्धोत्पादन मिळणे शक्य होते.
जनावरांचे गोठे आणि व्यवस्थापनगुरांचे गोठे हवेशीर परंतु ऊन, वारा, पाऊस व थंडी यापासून संरक्षण देणारे असावेत. गोठ्यात जनावरांची गर्दी होऊ देवू नये. गोठ्याच्या जमिनीवर टोकदार दगड, काडी, कचरा तसेच घाण साचेल असे खड्डे नसावेत. गुरांचा गोठा दिवसातून कमीत कमी तीन वेळा साफ करावा. पाय घसरणार नाही पण पाण्याचा निचरा होईल इतका उतार असावा. गोठ्याच्या कडेला छाया देणारे वृक्ष लावावे. शक्यतोवर गोठा उभारतांना गोठ्याची लांव बाजू पूर्व-पश्चिम आणि रूंद वाजू उत्तर-दक्षिण दिशेला असावी, पैकी उघडी वाजू दक्षिणेला ठेवल्यास ऊन, वारा, पाऊस आणि हिवाळयात उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेपासून संरक्षण मिळण्यास मदत होते.
जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन आणि रोगप्रतिबंधात्मक उपायज्याप्रमाणे पूर येण्यापुर्वी आड बांधणे आवश्यक असते त्याचप्रमाणे आपल्या गुरांना रोग होऊ नये म्हणून लसीकरण करून घेणे अत्यावश्यक ठरते.
१) लाळ्या-खुरकतसहा महिन्यावरील सर्व गोवर्गीय जनावरांना वर्षातून एकदा शक्यतोवर सप्टेंबर महिन्यात लसीकरण करून घ्यावे. लाळ्या खुरकत या रोगाविरूध्दची लस सर्वच ठिकाणी शासनामार्फत मोफत पुरवठा केला जात नाही. तेव्हा मोफत लसींवर विसंबून न राहता, ती लस बाजारातून विकत आणून डॉक्टरांकडून आपल्या गुरांना टोचून घ्यावी. अन्यथा आपल्या जनावरांपोटी होणाऱ्या संभाव्य नुकसानास सामोरे जावे लागते. कधी कधी या रोगामुळे संकरीत जनावरे मृत्युमुखी सुद्धा पडतात.२) घटसर्पसहा महिन्यावरील सर्व गोवर्गीय जनावरांना पावसाळ्यापूर्वी किंवा जून महिन्यात टोचून घेतली पाहिजे. नदी नाल्याकाठच्या गावातील गोवर्गीय जनावरांना ही लस टोचून घेणे अत्यंत आवश्यक असते.३) फऱ्या/एकटांग्यासहा महिने ते अडीच वर्ष वयोगटातील गोवर्गीय जनावरांना तसेच गरजेनुसार प्रौढ जनावरांनासुध्दा पावसाळ्याच्या प्रारंभी म्हणजेच दरवर्षी जून महिन्यात ही लग टोचून घेतली पाहिजे.लसीकरणासंबंधी एक महत्त्वाची बाब ही की पशुपालकांनी गाभण जनावरांना लस टोचून घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.४) जनावरांना होणारी कृमी किंवा जंतबाधा निवारणजनावरांच्या जठगत, आतड्यात व यकृतात निरनिराळ्या प्रकारचे कृमी किंवा जंताचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे चयापचनाचे आजार, हगवण, वाढ खुटणे, चामडी खरबडीत होणे, केस झडणे, दुध उत्पादन कमी करणे तसेच अशक्तपणा इत्यादी लक्षणे दिसून येतात. कधी कधी लहान वासरांना मोठया प्रमाणात जंतबाधा होऊन ती मृत्युमुखी पडतात तेव्हा पशुपालकांनी आपल्या जनावरांना किमान तीन किंवा चार महिन्यातून एकदा जंतनाशक किंवा कृमीनाशक औषधी द्यावीत.५) गोचिड व गोमाशांमुळे होणारे आजारपशुपालकांच्या दुर्लक्षतेमुळे आजकाल गुरांच्या अंगावर त्याचप्रमाणे गोठ्यात गोचिड व गोमाशा फार मोठ्या संख्येने दिसून येतात. गोचिड साधारणपणे कासेच्या आसपास, पायाच्या आतील भागावर त्याचप्रमाणे शेपटाखाली आजूबाजूला चिकटलेले आढळतात, त्यामुळे जनावरे सतत अस्वस्थ राहतात. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर तसेच एकंदरीत उत्पादनावर होतो. जनावरांच्या अंगावर गोचिड असल्यास, गोचिड रक्तशोषण करतात त्याचवरोवर रक्तामध्ये जंतुचा प्रसारही करतात. त्यामुळे जनावरे थायलेरियासीस, बॅबेसियासीस व ट्रिपॅनोसोमीसासीस (सर्रा) सारख्या भयंकर रोगांना बळी पडतात. या रोगावरचा औषधोपचार पशुपालकांना महागडा ठरतो, म्हणून गोचिड व गोमाशांचा नायनाट करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या आधुनिक औषधांचा वापर डॉक्टरांचा सल्ला घेऊन जनावरांचे अंगावर तसेच गोठ्यात नियमित करावा. (ही औषधे विपारी असतात त्यामुळे याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे, जेणेकरून जनावरांना विषबाधा होणार नाही) 'एकात्मिक गोचिड निर्मुलनाचे' दृष्टीने घरगुती कुक्कुट पालन म्हणून ५ ते १० कोंबड्या पाळल्यास जनावरांच्या अंगावरील त्याचप्रमाणे गोठ्यातील गोचिडांचा नायनाट करणे शक्य होते. याशिवाय गोचिड निर्मुलनाच्या दृष्टीने सिताफळाच्या पानांचा काढा सुध्दा उपयुक्त ठरतो. (काढा लावतांना जनावरांच्या डोळ्याची काळजी घ्यावी.)६) गर्भाशयाचा आजारजनावर व्याल्यानंतर साधारणत: ५ ते ७ तासाच्या आत चार (जार) पडायला पाहिजे. कधी कधी अशक्तपणा किंवा इतर कारणांमुळे जार पडायला उशिर होतो, अशावेळी डॉक्टरांच्या हातानेच जार काढून घ्यावा व कमीत कमी २ ते ३ दिवसापर्यंत योग्य तो औषधोपचार करून घ्यावा. यावावत हयगय किंवा घरगुती उपचार करू नये. कारण गर्भाशयात जर जंतुचा प्रादुर्भाव झाला आणि औषधोपचार पूर्ण करून घेतला नाही तर जनावर गाभण न राहणे, वारंवार उलटणे त्याचप्रमाणे दुधाचे उत्पादन कमी होणे अशा तक्रारी सुरू होतात. कारण 'निरोगी गर्भाशय' हे दुग्धव्यवसायाचे महत्त्वाचे अंग आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.७) कासेचा आजारनुकत्याच व्यालेल्या गायी-म्हशींची कास मोठी व दुधाने भरलेली असते. अशावेळी गोठ्याची जमीन स्वच्छ ब योग्य नसेल तर बसते उठतेवेळी कासेला किंवा स्तनाला वारीक सारीक जखमा होऊन त्यातून जंतुचा शिरकाव होतो. त्यामुळे दुधाळू जनावरांना स्तनदाह नावाचा आजार होतो. त्यासाठी जनावराच्या कासेची तसेच गोठ्याची स्वच्छता ठेवणे फार महत्वाची बाब ठरते. कासेवर आलेली सूज, स्तनाला हात लावताच जनावराने लाथ झाडणे, दुधाची धार बरोबर न येणे, दुधावाटे रक्त येणे, दुधाऐवजी पाण्यासारखा पदार्थ येणे, दुधात दह्यासारखे बारीक खवले दिसणे व दुधाला दुर्गंधी येणे इत्यादी लक्षणे गंभीर समजावीत याबाबत डॉक्टरांकडून त्वरीत औषधोपचार करून घ्यावा. घरगुती उपचार करून त्यात वेळ घालवू नये. स्तनातून दुधाची धार निट येत नाही म्हणून त्यावाटे काडी किंवा तार घालणे अतिशय घातक ठरते. कासेचा आजार असलेल्या गायीचे दूध शेवटी काढून नालीत फेकून द्यावे. गोठ्यातील जमिनीवर टाकू नये त्यामुळे गोठयात जंतुंचा प्रसार होऊ शकतो. कासेचा औषधोपचार थोडा महागडा असला तरी तो वेळ न घालविता करून घेणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा दुध उत्पादनाच्या दृष्टीने कायम स्वरूपी नुकसान होण्याची दाट शक्यता असते. अंगठा मुडपून स्तनावर दाब देऊन दुध काढू नये. अधुन मधुन दुधाची तपासणी डॉक्टरांकडून करून घ्यावी. जेणेकरून प्राथमिक अवस्थेत स्तनदाह असल्याचे कळते व त्यावर वेळीच तसेच कमी खर्चात यशस्वी औषधोपचार करणे शक्य होते.८) दुग्धज्वर किंवा दुधाचा तापजास्त दुध देणाऱ्या गायी-म्हशींना व्यायल्यानंतर अवघ्या १ ते २ आठवड्यात सहसा होणारा पण ताप नसलेला असा हा रोग आहे. जास्त चिक दिल्यामुळे जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमचा भरपूर प्रमाणात निचरा होतो. पर्यायाने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते, त्यामुळे या आजारामध्ये जनावर तात्काळ दूध देणे कमी किंवा बंद करते. यामध्ये जनावर प्रथम थरथर कापते, सुस्त होऊन बसकन मारते, डोके पोटावर ठेवून मंद श्वास घेते, तोंडातून लाळ गाळते व शरीर थंड पडते इत्यादी या रोगाची लक्षणे दिसून येतात. अशावेळी बहुतांशी पशुपालक अंधश्रध्देला बळी पडल्याचे दिसून येतात आणि जनावरांचा औषधोपचार करून घेत नाहीत. तेव्हा असल्या कुठल्याही अंधश्रध्देला वळी न पडता जवळच्या गुरांच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना जनावरांची लक्षणे सांगितल्यास अचूक निदान होण्यास मदत होऊन योग्य तो उपचार केला जातो आणि जनावर पुर्ववत नियमीत दुध देणे सुरू करते.
अशाप्रकारे पशुपालकांनी दुग्ध व्यवसायाबाबतीत माहिती आत्मसात करून आपल्या दैनंदिन जीवनासोबतच गायी-म्हशीची निगा राखल्यास आणि योग्य व्यवस्थापन केल्यास दुध उत्पादनात वाढ होऊन उत्पन्न वाढते, म्हणजेच दुग्धव्यवसाय निश्चितच फायदेशीर ठरतो.
पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागक्रांनापापवैम, शिरवळ, जि. सातारा