Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > उन्हाळात नको असेल चाऱ्याची टंचाई तर आताच करा चारा नियोजनाची घाई

उन्हाळात नको असेल चाऱ्याची टंचाई तर आताच करा चारा नियोजनाची घाई

If you don't want fodder shortage in summer, hurry up the fodder planning now | उन्हाळात नको असेल चाऱ्याची टंचाई तर आताच करा चारा नियोजनाची घाई

उन्हाळात नको असेल चाऱ्याची टंचाई तर आताच करा चारा नियोजनाची घाई

जनावरांना वर्षभर लागणाऱ्या हिरवा चारा व कोरडा चारा यांचे नियोजन करून दूध उत्पादकांनी चाऱ्याचे वर्षभराचे नियोजन (Dairy Fodder Management) करणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते जून या महिन्यांत चाराटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे हे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे.

जनावरांना वर्षभर लागणाऱ्या हिरवा चारा व कोरडा चारा यांचे नियोजन करून दूध उत्पादकांनी चाऱ्याचे वर्षभराचे नियोजन (Dairy Fodder Management) करणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते जून या महिन्यांत चाराटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे हे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जनावरांना वर्षभर लागणाऱ्या हिरवा चारा व कोरडा चारा यांचे नियोजन करून दूध उत्पादकांनी चाऱ्याचे वर्षभराचे नियोजन करणे गरजेचे आहे. हिरव्या चाऱ्यातून (Green Fodder) जीवनसत्त्व अ व जीवनसत्त्व इ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते जून या महिन्यांत चाराटंचाईला सामोरे जावे लागते. याच काळात सरकी पेंड, चुणी, पशुखाद्याचे दर वाढलेले असतात.

अशा ऐन वेळी चारा टंचाईस सामोरे जायचे असेल तर खरीप हंगामापासूनच त्याअनुषंगाने नियोजन करणे गरजेचे आहे. चाऱ्याचे नियोजन करतांना नेमकं काय करावं ? असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. तर त्यासाठीच आज आपण या लेखाच्या माध्यमातून चारा नियोजन जाणून घेणार आहोत. 

जनावरांची चाऱ्याची गरज

ज्या पशुपालकाकडे १० गाई किंवा म्हशी आहेत, त्यांना एका जनावराला दिवसाला सरासरी प्रती जनावरं ६ किलो पशुखाद्य याप्रमाणे ६० किलो पशुखाद्य लागेल. म्हणजे १८०० किलो प्रतिमहिना. म्हणजे हेच प्रमाण १० उत्पादकांचे गृहीत धरल्यास १८ टन प्रति महिना इतके पशुखाद्य लागेल. हेच प्रमाण चाऱ्याचे गृहीत धरल्यास ७०० टन हिरवा चारा व सुमारे २०० टन कोरडा चारा लागेल.

मुरघास (Silage) 

हिरवा चारा मुरघास स्वरूपात सुमारे एक वर्ष साठवता येतो. यासाठी बंकर सायलेज, पीट सायलेज, बेलड सायलेजचा वापर करावा. काही ठिकाणी कोरड्या चाऱ्याला पर्याय म्हणून हाय फायबर पेलेट्सचा वापरही केला जातो. हिरवा चारा म्हणजे केवळ हिरवी मका या मानसिकतेतून बाहेर यावे. जे शेतकरी वर्षभर हिरवा चारा लागवड करू शकतात. ते जास्त प्रथिनयुक्त चाऱ्याची लागवड वर्षभर करून चांगला व्यवसाय करू शकतात किंवा चाऱ्याचे मुरघास बनवून पुढील १२ महिने पर्यंत हिरवा चारा संपल्यावर त्याचा वापर करू शकतात.

कोरडा चारा (Dry Fodder)

कोरडा चारा म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणात खरीप व उन्हाळी हंगामात घेतली जाणारी बाजरी उत्तम पर्याय आहे. बाजरी चार्‍याची कुट्टी करून ती साठवून ठेवल्यास दीर्घ काळ उपयोगात येऊ शकते. तसेच बाजारीचे पीक अनेक भागात मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने कमी खर्चात देखील उपलब्ध होऊ शकणारा चारा म्हणून बाजरी योग्य पर्याय आहे. 

अशा पद्धतीने नियोजन करून भविष्यातील चारा टंचाई वर मात करता येऊ शकते. ज्यासाठी केवळ योग्य नियोजनाची गरज आहे. 

हेही वाचा - Animal Care In Rain शेतकरी दादा ! पावसाळ्यात आजारांचा धोका, पशुधनाची काळजी घ्या

Web Title: If you don't want fodder shortage in summer, hurry up the fodder planning now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.