Join us

वाढवायचे असेल पशुधनापासून उत्पन्न तर अवश्य करा कृत्रिम रेतन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 12:36 PM

पशुवैद्यकीय क्षेत्राने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खूप मोठी प्रगती केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व तंत्रज्ञान पशुपालकाच्या गोठ्यात वापरले जाते. त्यासाठी त्याच पद्धतीने त्याची रचना केली जाते. त्यापैकीच एक जैवतंत्रज्ञान म्हणजे 'कृत्रिम रेतन' ज्याच्या वापराने देशात स्वेतक्रांती झाली आणि पशुपालकाच्या उत्पन्नात वेगाने वाढ झाली.

पशुवैद्यकीय क्षेत्राने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खूप मोठी प्रगती केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व तंत्रज्ञान पशुपालकाच्या गोठ्यात वापरले जाते. त्यासाठी त्याच पद्धतीने त्याची रचना केली जाते. त्यापैकीच एक जैवतंत्रज्ञान म्हणजे 'कृत्रिम रेतन' ज्याच्या वापराने देशात स्वेतक्रांती झाली आणि पशुपालकाच्या उत्पन्नात वेगाने वाढ झाली.

राज्यात कृत्रिम रेतनास सन १९४८ मध्ये मिळालेल्या मंजुरीनंतर सन १९५० मध्ये प्रत्यक्ष कृत्रिम रेतनास सुरुवात झाली. दूध उत्पादन वाढीसाठी सुरुवातीला सहिवाल, गीर, रेड सिंधी व सुरती व मुर्हा या जातीच्या वळूचा वापर केला गेला. गावठी गाई-म्हैशीमध्ये अनुवंशिक सुधारणा करून दूध उत्पादन वाढीचा प्रयोग केला गेला. नंतर मग विदेशी दुधाळ जातीच्या एचएफ व जर्सी यांचा वापर सुरू झाला. पुढे १९६८ मध्ये परदेशातील गोठीत रेत मात्रा आयात करून त्याचा वापर केला जो किफायतशीर व फलदायी ठरला.

साठच्या दशकात सांगली जिल्ह्यात देखील या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. सुरुवातीला मिरजेत पंढरपूर रोडवर निमजगा माळावर, सध्याच्या पोलीस स्टेशन मागे जिल्हा कृत्रिम वेतन केंद्र होते. त्या ठिकाणी विभागाने सुरती, मुर्हा व जर्सी, एचएफ जातीचे वळू सांभाळले होते. त्यांना योग्य तो व्यायाम मिळावा म्हणून खास सोय केली होती. त्या वळूंचे भल्या सकाळी वीर्य गोळा करून त्यामध्ये अंड्याचा बलक, व नॉर्मल सलाईन काही प्रतिजैवके याचा वापर करून योग्य शुक्रजंतूंची संख्या निश्चित ठेवून शास्त्रोक्त पद्धतीने जंतू विरहित कुप्यामध्ये हे द्रवरूप वीर्य भरून लाकडी पेट्यातून जिल्ह्यातील दवाखान्यांना पुरवण्यात येत असे.

अधिक वाचा: लाळ खुरकुत रोगापासून जनावरांचे कसे कराल संरक्षण

अनेक जुन्या मंडळींनी अशा पेट्या एसटीतून प्रवास करताना पाहिल्या असतील. त्या पेट्या संबंधित दवाखान्यातील परिचर एसटी स्टँडवर उतरवून घेत व दवाखान्यात सकाळपासून आलेल्या गाई म्हशींना त्याचा वापर करून कृत्रिम वेतन केले जायचे. जास्तीत जास्त योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास ३६ तासांपर्यंत ते वापरता येत असे. आठवड्यातून तीन दिवस अशा प्रकारे मिरज येथे वीर्य गोळा केले जायचे व वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यामध्ये वाढ करून एसटीद्वारे जिल्ह्यातील दवाखान्यांना पुरवले जायचे.

या माध्यमातून संकरीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात राबवण्यात आला. जिल्ह्यात त्यानंतर गोठीत रेतमात्रांचा वापर सुरू झाला. योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास अनेक वर्ष त्या वापरता येतात. जिल्ह्यात त्याच्या वापरातून डिसेंबर २३ अखेर एकूण १०४७१६ कृत्रिम रेतने झाली आहेत. या पुढील तंत्रज्ञान म्हणून लिंगवर्गीकृत रेतमात्रांचा वापर, भृणप्रत्यारोपण यासारख्या जैवतंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे संपूर्ण देशभर पुरवल्या जाणाऱ्या लिंगवर्गीकृत रेतमात्रा चितळे यांच्या कंपनीद्वारे निर्माण केल्या जातात हे विशेष.

डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

टॅग्स :दुग्धव्यवसायगायशेतकरीऔषधंसांगलीदूध