Join us

राज्यातील दुधाच्या गुणवत्ता तपासणीबाबत महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 4:39 PM

दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे अधिकार आता...

राज्यातील दुध गुणवत्तेच्या तपासणीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना असल्याचे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आले आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावरआज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यावेळी दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे अधिकार याआधी अन्न व औषध प्रशासनाकडे होती. ती आता पशुसंवर्धन आयुक्तांकडे राहणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक भारतीय घरात दूधाचे अनन्यसाधारण महत्व आहे. यात दुधात भेसळ केल्यानंतर त्याची शुद्धता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भेसळयुक्त दुधाचे दूष्परिणाम

  • भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्याने आतडी, किडनी, लिवरसह अनेक अवयवांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
  • भेसळयुक्त दुधात पाणी टाकल्याने दुध पातळ होतं आणि त्यातील पोषक तत्व कमी होतात.
  • युरिया, कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर, सोडा आणि फॉरेमॅलिन या संश्लेषणांमुळे सिंथेटिक दूध तयार केले जाते.
  • त्यामुळे फूड पॉयझनिंय आणि उल्टी, जुलाब यासारख्या समस्यांची संभावना वाढते.
  • दुध उत्पादकांची गुणवत्ता नियंत्रित करण्यात आल्यानंतर, स्वस्थ आणि सुरक्षित दुध प्रस्तुत करण्याची गरज आहे.
टॅग्स :दूधदुग्धव्यवसाय