Join us

उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 11:08 AM

दरात घसरण झाल्याने तसेच उन्हामुळे दूध संकलनात १५-२० टक्क्यांनी घट झाली. अशातच लग्नसराई व उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात हळूहळू वाढ होत आहे.

सोलापूर : दरात घसरण झाल्याने तसेच उन्हामुळे दूध संकलनात १५-२० टक्क्यांनी घट झाली. अशातच लग्नसराई व उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात हळूहळू वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात २६ रुपयांचा २७ रुपये झालेला दर १ मेपासून २८ रुपये होणार आहे.

जागतिक पातळीवर पावडर व बटरला म्हणावी तशी मागणी नाही. त्यामुळे बटर व पावडरीच्या दरात मागील वर्षभरात सुधारणा झाली नाही. त्यामुळे दूध खरेदी दरात मोठी घसरण झाली. ३९ रुपयांवर गेलेला गाय दूध खरेदी दर २६ रुपयांवर आला होता.

शासनाने गाय दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर केले. मात्र त्याचा परिणाम दूध खरेदीवर झाला नाही; त्यामुळे आपल्याकडील बरीचशी दुभती जनावरे शेतकऱ्यांनी विक्री केली. याशिवाय दुधाला दर कमी असल्याने शेतकरी पशुखाद्य व हिरवा चारा पुरेसा घालत नाहीत. याचाही परिणाम दुधावर झाला आहे.

उन्हाळ्याचाही फटका बसल्याने १५ ते २० टक्क्यांपर्यंत संकलन कमी झाले आहे. इकडे उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. यामुळे दूध खरेदीदरात वाढ होत आहे. मागील वर्षभरात गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर २६ रुपयांवर आलेला दर उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे.

यामुळे दूध खरेदीदरात वाढ होत आहे. मागील वर्षभरात गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर २६ रुपयांवर आलेला दर याच महिन्यात एक रुपयाने वाढ होऊन २७ रुपये झाला आहे. १ मेपासून आणखी एक रुपयाची वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना आता २८ रुपये मिळणार आहेत.

दूध संकलनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट झाली असली तरी त्या प्रमाणात दूध खरेदी दरात वाढ करता आली नाही. पावडर व बटरच्या दरात वाढ झालेली नसल्याने दूध खरेदीदरात म्हणावी तशी वाढ करता येत नाही. अशातही दूध खरेदीदरात वाढ होत आहे. - दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई दूध

अधिक वाचा: शेती नसेल तरीही तुम्ही कमी वेळेत, कमी खर्चात घेऊ शकाल ह्या पौष्टीक चाऱ्याचे उत्पादन

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेतकरीबाजारदूध पुरवठा