Join us

म्हैस दूध खरेदी दरात दीड रुपयानी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2023 11:33 AM

म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. आज रविवारपासून अंमलबजावणी होणार असून दूध विक्री दराबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

'गोकुळ' संघाने म्हैस दूध खरेदी दरात प्रतीनुसार प्रतिलिटर एक ते दीड रुपयांची वाढ तर गायदूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपातीचा निर्णय घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली. आज रविवारपासून अंमलबजावणी होणार असून दूध विक्री दराबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. म्हैस दूध ५.५ ते ६.४ फॅट व ९.० एस. एन. एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर एक रुपयांनी तर ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर दीड रुपये खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. राज्यातील खासगी, इतर दूध संघांनी गाय दुधाचे खरेदी दर कमी केले आहेत. त्याचबरोबर बाजारपेठेतील दूध पावडर, बटर, लोणीचे दर कमी झाल्याने गाय दूध खरेदी दरात कपातीचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

म्हैस दूध खरेदीचा दर, प्रतिलिटरफॅट    एस. एन. एफ   सध्याचा दर      नवीन दर६.०      ९.०                   ४९.५० रुपये      ५०.५० रुपये६.५      ९.०                   ५१.३० रुपये       ५२.८० रुपये७.०      ९.०                   ५४.०० रुपये       ५५.५० रुपये७.५     ९.०                    ५५.५० रुपये      ५७.०० रुपये

गाय दूध खरेदीचा दर, प्रतिलिटरफॅट    एस. एन. एफ    सध्याचा दर      नवीन दर३.५     ८.५                    ३५                      ३२४.०     ८.५                    ३६.५०                ३४.५०४.५     ८.५                    ३८                      ३६५.०     ८.५                    ३९.५०                ३७.५०

म्हैस दूध विक्री दरात वाढ होणार?गोकुळ'ने म्हेस दूध खरेदी दरात वाढ केली असली तरी दरातही वाढ अद्याप विक्री दरात वाढ केलेली नाही. मात्र, आठवडाभरात विक्री करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधगोकुळकोल्हापूरगाय