२०३० पर्यंत जागतिक दुध उत्पादनात भारताचा वाटा एक तृतीयांश एवढा वाढवण्याचे भारताचे लक्ष्य असल्याचे एनडीडीबीने सांगितले. यासाठी प्राण्यांचे प्रजनन, पोषण आणि आरोग्य यावर येत्या काळात लक्ष केंद्रित करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सध्या जागतिक दुध उत्पादनात भारताचा वाटा केवळ २४ टक्के म्हणजे एक चतुर्थांश आहे. आपल्या जीडीपीमध्ये दुध उत्पादनाचा वाटा ४ ते ५ टक्के असून जगतिक स्तरावर ३० टक्के एवढा वाटा वाढवण्याचे उदिष्ट आहे.
दुधाचे हृदयासाठी आणि हाडांसाठी फायदेच फायदे
भारतात अल्पभूधारक शेतकरी जोडधंदा म्हणून डेअरी व्यवसाय करतात. दुधाचा सर्वात मोठा उत्पादक म्हणून आपण गणलो जात असलो तरी प्राण्यांची उत्पादकता वाढवणे महत्वाचे असल्याचे अधोरेखित करण्यात आले. भारत सरकार आणि एनडीडीबी एकत्रितपणे यावर काम करत असल्याचे सांगण्यात आले.