Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > दुष्काळ येईल अस वाटतंय; जनावरांसाठी कमी खर्चात मुरघास बनवून ठेवूया

दुष्काळ येईल अस वाटतंय; जनावरांसाठी कमी खर्चात मुरघास बनवून ठेवूया

It seems that there will be a drought; Let's make silage murghas for livestock at low cost | दुष्काळ येईल अस वाटतंय; जनावरांसाठी कमी खर्चात मुरघास बनवून ठेवूया

दुष्काळ येईल अस वाटतंय; जनावरांसाठी कमी खर्चात मुरघास बनवून ठेवूया

यंदा पर्जन्यमान कमी झालेले असल्यामुळे उन्हाळ्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पशुपालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी भविष्यात निर्माण होणाऱ्या पाळीव जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नावर रामबाण उपाय म्हणून मुरघासाची निर्मिती पशुपालकांनी करून चाऱ्याचे व्यवस्थापन करणे.

यंदा पर्जन्यमान कमी झालेले असल्यामुळे उन्हाळ्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पशुपालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी भविष्यात निर्माण होणाऱ्या पाळीव जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नावर रामबाण उपाय म्हणून मुरघासाची निर्मिती पशुपालकांनी करून चाऱ्याचे व्यवस्थापन करणे.

शेअर :

Join us
Join usNext

अजय जाधव
यंदा पर्जन्यमान कमी झालेले असल्यामुळे उन्हाळ्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पशुपालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी भविष्यात निर्माण होणाऱ्या पाळीव जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नावर रामबाण उपाय म्हणून मुरघासाची निर्मिती पशुपालकांनी करून चाऱ्याचे व्यवस्थापन करणे काळाची गरज बनली आहे.

पाळीव जनावरांना १२ महिने हिरवा चारा पुरवणे हे पशुपालकांना शक्य नसते. उन्हाळ्यात तर हिरवा चाराच उपलब्ध नसतो. हा चारा त्यातील पोषकद्रव्यासह जनावरांना मिळण्यासाठी मुरघासाची निर्मिती पशुपालक शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे. हवा विरहित जागेत आंबवून साठवलेला चारा म्हणजे मुरघास.

यामध्ये पोषक हरितद्रव्यांची साठवणूक केली जाते. त्यामुळे भर उन्हाळ्यात ही पोषक हरितद्रव्य पाळीव जनावरांना मुरघासाच्या माध्यमातून उपलब्ध होतात. जनावरे हे मुरघास आवडीने खातात. त्यामुळे त्यांना आवश्यक असणारी पोषकद्रव्ये मिळतात.

चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करण्यासाठी..
द्विदल वर्गीय पिकामध्ये बारीक तुकड्यांवर १ ते १.५ टक्के गुळाचे पाणी तसेच एकदल पिकामध्ये एक टक्का युरिया पाण्यात मिसळून फवारावा. खड्डा पूर्ण भरल्यानंतर खड्याच्या पृष्ठभागावर ३ ते ४ फूट उंच वैरणीचा निमुळता ढीग करावा आणि त्यावर निरुपयोगी गवत किंवा कडब्याच्या पेंड्यांचा भर पसरावा. त्यानंतर शेण व चिखल यांच्या मिश्रणाचा थर देऊन खड्डा झाकून घ्यावा. खड्यावर पॉलिथीन पेपर अंथरला तरी चालते.

मुरघास तयार करण्याची पद्धत
मक्याचे, ज्वारी, बाजरीचे पीक व उसाच्या पाचटांची प्रथम कुट्टी यंत्राच्या साह्याने कुट्टी करून ते खड्यामध्ये भरावे, यामध्ये खड्डा भरत असताना वरून सतत दाब द्यावा. खड्ड्यात हवा भरणार नाही, याची काळजी घ्यावी. हवा राहिल्यास चारा कुजण्याचा धोका असतो.

मुरघासचा कालावधी..
मुरघास तयार होण्यास ५५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर मुरघास काढण्यासाठी खड्ड्याच्या तोंडास थोडेसे भोक पाडून त्यातून रोज मुरघास काढून घ्यावा, मुरघास काढून घेतल्यानंतर त्यावर वाळलेले गवत वगैरे घालून तोंड बंद करावे. दुभत्या जनावरांस दररोज १० ते १५ किलो मुरघास खाऊ घालावा.

सकस चारा कसा तयार करावा?
गव्हाचा आणि भाताचा भुसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतो. तसेच गव्हाचे काड व उसाचे वाढे सहज उपलब्ध होऊ शकते. पशुपालक या चाऱ्याचा उपयोग पशुखाद्य म्हणून करू शकतात. हे खाद्य सकस बनवण्यासाठी त्यावर युरिया व उसाच्या मळीची प्रक्रिया केली तर त्यापासून चांगले सकस पशुखाद्य जनावरांना उपलब्ध होऊ शकते. यासाठी १ टक्के युरिया व १० टक्के उसाची मळी (मोलसीस) म्हणजे (१ किलो युरीया, १० किलो उसाची मळी, २०० लिटर पाणी) यांच द्रावण तयार करून ते १०० किलो कोरड्या भुशावर, उसाच्या पाचटीवर, वाळलेल्या डोंगरी गवतावर शिंपडल्याने या चाऱ्याची आहारविषयक गुणवत्ता वाढते.

जनावरांना वर्षभर चाऱ्याचे नियोजन करताना पशुपालकांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संशोधित फुले जयवंत-संकरित नेपीअर गवताची लागवड करावी. हे पीक वर्षभर उपलब्ध होणारे तसेच कमी पाण्यावर येणारे व इतर चाऱ्यापेक्षा अधिक पोषक व प्रथिनेयुक्त आहे. या पिकाचे हेक्टरी उत्पादन २०० ते २५० टन आहे. उन्हाळी हंगामात फेब्रुवारी-मार्च महिन्यांत याची लागवड करता येते. - नीता भोसले, पशुवैद्यकीय अधिकारी, इंदोली

Web Title: It seems that there will be a drought; Let's make silage murghas for livestock at low cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.