Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > जाफराबादी दुभत्या म्हशींचा तोरा वाढला, कशाने वाढल्यात किमती?

जाफराबादी दुभत्या म्हशींचा तोरा वाढला, कशाने वाढल्यात किमती?

Jafarabadi dairy buffalo price incresed in the market, what has increased the prices? | जाफराबादी दुभत्या म्हशींचा तोरा वाढला, कशाने वाढल्यात किमती?

जाफराबादी दुभत्या म्हशींचा तोरा वाढला, कशाने वाढल्यात किमती?

मागणी वाढताच म्हशीच्या किमती २५ हजार ते ३० हजार रुपयांनी वाढल्या आहेत.

मागणी वाढताच म्हशीच्या किमती २५ हजार ते ३० हजार रुपयांनी वाढल्या आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

छावणीत दर गुरुवारी भरणारा जनावरांचा बाजारात दुभत्या म्हशीला मोठी मागणी वाढली आहे. त्याचे कारणही तसेच आहे उन्हाळ्यात दुधाचे प्रमाण कमी होते, अशावेळी दुभत्या म्हशी खरेदी करून दुधाचा तुटवडा काही प्रमाणात कमी केला जातो. यामुळे सध्या म्हशीचे भाव सव्वा ते दीड लाखाच्या वर जाऊन पोहोचले आहे.

म्हशीच्या विक्रीसाठी प्रसिद्ध

छावणीतील आठवडीबाजार हा खास म्हशीच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातून लोक येथे म्हशी खरेदीसाठी येत असतात. दर आठवडी बाजारात २५ पेक्षा अधिक म्हशी विकल्या जातात.

का वाढले भाव

• उन्हाळ्यात म्हशी दूध कमी देतात. यामुळे मागणी तेवढीच पण दुधाचा तुटवडा जाणवत आहे. मागणी व पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी जनावरांचे मालक नवीन म्हशी खरेदी करतात.

मागणी वाढताच म्हशीच्या किमती २५ हजार ते ३० हजार रुपयांनी वाढल्या आहेत. धुळे, गुजरातहून येणाऱ्या म्हशीला सव्या ते दीड लाखाचा भाव मिळत आहे. तर स्थानिक म्हशीला ८० हजार ते ८५ हजारांचा भाव मिळत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

जाफराबादी म्हशीला मागणी

गुजरातमधील जाफराबाद येथील म्हशीला छावणी बाजारात जास्त भाव मिळत असतो. त्यात दुभती म्हशी दिवसभरात १६ ते २० लिटरपर्यंत दुध देत असल्याने या म्हशी जास्त किंमत देऊन खरेदी केले जातात. 'जाफराबादी म्हशी' नावानेच विकल्या जातात. एका-एका म्हशीचे वजन ८०० किलो ते १ टनापर्यंत असते.

Web Title: Jafarabadi dairy buffalo price incresed in the market, what has increased the prices?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.