Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Janavarantil Gochid : आपल्या गोठ्यात जनावरांना गोचीड होवू नयेत तर मग करा हे सोपे उपाय

Janavarantil Gochid : आपल्या गोठ्यात जनावरांना गोचीड होवू नयेत तर मग करा हे सोपे उपाय

Janavarantil Gochid : This is a simple solution to prevent gochid in your cattle shade livestock | Janavarantil Gochid : आपल्या गोठ्यात जनावरांना गोचीड होवू नयेत तर मग करा हे सोपे उपाय

Janavarantil Gochid : आपल्या गोठ्यात जनावरांना गोचीड होवू नयेत तर मग करा हे सोपे उपाय

परोपजीवी जनावरांना इजा पोचवून हैराण करतात. वेगवेगळ्या रोगकारक जंतूंचा जनावरांच्या शरीरापर्यंत प्रसार करतात. यापैकी महत्त्वाचा बाह्य परोपजीवी म्हणजेच कीटक वर्गीय गोचीड. हे गोचीड जनावरांचे रक्त शोषतात, तसेच त्यांच्या शरीरात विषारी द्रव सोडतात.

शेअर :

Join us
Join usNext

यांच्यामार्फत अतिशय जीवघेण्या आजारांच्या जंतूंचा जनावरांच्या शरीरात प्रसार होतो. परिणामी जनावरांची उत्पादन क्षमता क्षीण होत जाते. गोठ्यामध्ये ७० टक्के तर जनावरांनर १० ते २० टक्के गोचिड आढळतात.

जनावरांतील व गोठ्यातील गोचीड नियंत्रण कसे करावे?
-
 पशुतज्ञांच्या सल्ल्याने निलगिरी तेल, कडुलिंबाचे तेल, करंज तेल एकत्रित करून त्याचा फवारा जनावरांच्या अंगावर आणि परिसर सुरक्षेसाठी वापरता येतो.
- गोचिडनाशकांचा वापर व जनावरांचे तोंड, डोळे आणि योग्य पद्धतीने झाकलेले असावे. हातमोजे वापरणे बंधनकारक असते.
- गोचिड प्रादुर्भाव झालेल्या गोठ्यातील शेण, मूत्र मिश्रित माती पूर्णपणे खरडून घ्यावी. त्यानंतर चुना पावडर शिंपडावी.
- गोठ्यातील जमिनीवर दिवसातील काही काळ ऊन पडेल आणि जमीन कोरडी होईल याचे नियोजन करावे.
- जमिनीवरील दगड, विटा, मॅट इतर साहित्य उचलून त्याच्या खाली स्वच्छता करावी.
- गरम पाण्याने जमीन धुवून घ्यावी.
- गोठ्यातील जमिनीवरील भेगा, खड्डे, छिद्र बुजवून वर नमूद केलेली रासायनिक आणि हर्बल गोचिडनाशकांचे द्रावण प्रभाव मात्रेमध्ये शिंपडावे.
- गोठ्याच्या भिंतीला, गव्हाणीला चुना लावावा. भेगा, खड्डे, छिद्र बुजवावे.
- शक्य असल्यास भिंती आगीच्या बंदुकीने (फ्लेम गन) जाळून घ्याव्यात. 
- नवीन जनावर कळपात आणण्या अगोदर काही दिवस वेगळे बांधावे. निरोगी सिद्ध झाल्यावर कळपात सोडावे.
- नवीन जागेवर जनावर नेले असल्यास परत कळपात सोडण्याआधी गोचीड निर्मुलन करून सोडावे.
- चरायला जाणाऱ्या जनावरांचा दररोज खरारा करून मगच गोठ्यात बंदिस्त करावे.
- गोठ्यामध्ये देशी कोंबड्यांचा वावर असेल तर प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते.
- चारा, पिके, कुरण इत्यादीवर वनस्पतिजन्य गोचिडनाशकांची फवारणी करावी. 

अधिक वाचा: Murghas : मुरघास तयार करताना पिकांची निवड कशी करावी? वाचा सविस्तर

Web Title: Janavarantil Gochid : This is a simple solution to prevent gochid in your cattle shade livestock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.