Join us

Kadba Bajar Bhav : मराठवाड्याच्या कडब्याला मोठी मागणी; शेकडा कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:02 IST

सिंचन योजनांमुळे शेतकरी आता द्राक्ष, डाळिंब, केळी या फळबागांसह ऊस पिकाकडे वळाले आहेत. त्यामुळे जनावरांच्या कडब्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मोडनिंब : सिंचन योजनांमुळे शेतकरी आता द्राक्ष, डाळिंब, केळी या फळबागांसह ऊस पिकाकडे वळाले आहेत. त्यामुळे जनावरांच्या कडब्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

त्यामुळे मोडनिंबच्या आठवडा बाजारात दर शनिवारी तुळजापूर तालुक्यातून जवळपास ८० गाड्या कडब्याची आवक होत आहे. त्या कडब्याला १८०० ते २२०० रुपये प्रती शेकडा दर मिळत आहे.

मोडनिंब व परिसरातील माढा, पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील सिंचन योजनेमुळे फळबागांची लागवड वाढली आहे. शिवाय उसाचे क्षेत्रही वाढले आहे. माढा व पंढरपूर तालुक्यात ऊस, द्राक्ष, केळी, डाळिंब ही पिके प्रामुख्याने घेतली जात आहेत.

माढा तालुक्यातील काही शेतकरी जिराईत शेतीवर ज्वारीची पेरणी करीत होते. कारण वर्षभर दारात असलेल्या जनावरांसाठी चारा व कुटुंबाला पुरेल एवढे धान्य पिकवण्यासाठी धडपड असतो.

मात्र सध्या नगदी पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे ज्वारी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. १८०० तालुक्यातील ते २००० रूपये प्रती शेकडा दर मिळत आहे.

दारात बांधलेल्या जनावरांना कडबा खरेदी करायचा म्हणून आठवडा बाजारात मोहोळ येवती अन्य भागातील अनेक शेतकरी मोडनिंबला कडबा खरेदीसाठी आले होते. 

इतर पिके व फळबाग असल्यामुळे आम्ही ज्वारीची पेरणी करत नाही. त्यासाठी मोडनिंब आडत बाजारातून अथवा बार्शीतून ज्वारी खरेदी करतो. तर जनावरांसाठी कडबा अन्य जिल्ह्यातून मोडनिंबला येत असल्यामुळे आम्ही दरवर्षी कडबा खरेदी करतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

मराठवाड्यातून विक्रीला येतोय कडबाविक्रेते कळमण, तुळजापूर, तामलवाडी, येथून आलेले वजीर शेख, सोपान हजारे, यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी सांगितले की, कडब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही जनावरांना पाहिजे तेवढं कडबा ठेवून अन्य कडबा विक्रीसाठी आणतो. त्याचा दरही प्रती शेकडा १८०० ते २२०० मिळतो अशी सांगितले.

अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांमध्ये येणारा ताण कमी करण्यासाठी करा ह्या १० गोष्टी; वाचा सविस्तर

टॅग्स :ज्वारीशेतीशेतकरीसोलापूरमराठवाडाबाजारमार्केट यार्डऊस