National Gopal Ratna Award 2024 : पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने (DAHD) 2024 सालासाठी पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार (NGRA) विजेत्यांची घोषणा केली आहे. 26 नोव्हेंबर 2024 रोजी माणेकशॉ सेंटर, नवी दिल्ली येथे हे पुरस्कार प्रदान केले जातील. विजेत्यांना केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.
- यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची नावे
देशी गायी, म्हशींच्या जातींचे संगोपन करणारे सर्वोत्तम दुग्ध उत्पादक शेतकरी
प्रथम : रेणू, झज्जर, हरियाणा.
द्वितीय : देवेंद्रसिंग परमार, शाजापूर, मध्य प्रदेश.
तृतीय : सुरभी सिंग, बिजनौर, उत्तर प्रदेश.
NER साठी विशेष श्रेणीमध्ये
जुना तामुली बर्मन, बजाली, आसाम.
जुनुमा माळी, मोरीगाव, आसाम.
बेस्ट डेअरी सहकारी संस्था, दूध उत्पादक कंपनी, डेअरी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन
दोन प्रथम पुरस्कार (विभागून)
प्रथम : द गॅबेट मिल्क प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, अरवली, गुजरात.
प्रथम : दूध उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड, बिसनल, बागलकोट, कर्नाटक.
दुसरी : प्रतापपुरा दूध उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड प्रतापपुरा, भिलवाडा, राजस्थान.
तृतीय : TND 208 वडापाथी एपीसीएम लिमिटेड, कुड्डालोर, तमिळनाडू.
NER साठी विशेष श्रेणीमध्ये
कामधेनू दूध उत्पादक समबाय समिती लिमिटेड नित्यानंद, बजाली, आसाम.
सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AIT)
दोन प्रथम पुरस्कार (विभागून)
प्रथम : भास्कर प्रधान, सुवर्णापूर, ओडिशा.
प्रथम : राजेंद्र कुमार, हनुमानगड, राजस्थान.
द्वितीय : वीरेंद्रकुमार सैनी, हनुमानगड, राजस्थान.
तिसरा : व्ही अनिल कुमार, अन्नामय्या, आंध्र प्रदेश.
NER साठी विशेष श्रेणीमध्ये
मोहम्मद अब्दुर रहीम, कामरूप, आसाम.
हेही वाचा : Pashu Ganana 2024 : पशुगणनेला होणार उद्यापासून सुरुवात ; प्रगणकांची झाली नियुक्ती