Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Agri Business : शेतीपूरक व्यवसाय करायचाय? असं मिळतंय 50 लाखांपर्यंत अनुदान, वाचा सविस्तर 

Agri Business : शेतीपूरक व्यवसाय करायचाय? असं मिळतंय 50 लाखांपर्यंत अनुदान, वाचा सविस्तर 

Latest News agri business Subsidy of up to 50 lakhs for agricultural businesses read in detail. | Agri Business : शेतीपूरक व्यवसाय करायचाय? असं मिळतंय 50 लाखांपर्यंत अनुदान, वाचा सविस्तर 

Agri Business : शेतीपूरक व्यवसाय करायचाय? असं मिळतंय 50 लाखांपर्यंत अनुदान, वाचा सविस्तर 

Agri Business : प्रकल्पाकरीता १० टक्के स्व: हिस्सा तर उर्वरित ४० टक्के बँकेकडून (Agri Business Subsidy) कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 

Agri Business : प्रकल्पाकरीता १० टक्के स्व: हिस्सा तर उर्वरित ४० टक्के बँकेकडून (Agri Business Subsidy) कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 

शेअर :

Join us
Join usNext

Agri Business :  राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Abhiyan) योजनेंतर्गत शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फाॅडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरीता ५० टक्के अनुदान देण्यात येते. प्रकल्पाकरीता १० टक्के स्व: हिस्सा तर उर्वरित ४० टक्के बँकेकडून (Agri Business Subsidy) कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 

योजनेला लाभ शेतकरी व्यक्तिगत, शेतकरी गट किंवा स्वयंसाहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, स्टार्टअप ग्रुप आदींना घेता येतो. शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या पशुपालन (Animal farming) व वैरण निर्मिती या कल्याणकारी योजनेद्वारे स्वत:च्या उत्पन्न वाढीबरोबर अंडी, मांस, दूध, लोकर आदी व्यवसायांतून इतरांसाठी रोजगार निर्मिती होऊन गावाचा विकास साधला जाऊ शकतो.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड, पॅनकार्ड, प्रकल्प अहवाल, शेतीचा सातबारा किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीचे कागदपत्र, बँक खाते पासबुक, रहिवासी पुरावा, अनुभव प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र, नोंदणीकृत कंपनीसाठी जीएसटी नोंदणी, लेखामेळ आणि आयकर रिटर्न भरलेला असणे आवश्यक आहे.

दोन टप्प्यांत मिळते अनुदान
या योजनेंतर्गत दिले जाणारे अनुदान एकूण प्रकल्प किमतीच्या ५० टक्क्यांप्रमाणे दोन टप्प्यांत देण्यात येते. अनुदानाचा पहिला टप्पा हा केंद्र शासनाने प्रकल्प मंजूर केल्यानंतर प्रकल्पाचे बांधकाम सुरू करून जिल्हा तपासणी अहवालानंतर देण्यात येतो. दुसरा अंतिम टप्पा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो.

असे मिळते अनुदान

  • शेळी-मेंढी पालन : १० ते ४० लाख
  • कुक्कुट पालन : २५ लाख
  • वराह पालन : १५ ते ३० लाख
  • पशुखाद्य व वैरण निर्मिती : ५० लाख

 

या योजनेत अर्ज करण्यासाठी खालील संस्थांना अर्ज करता येतो: 

  • कोणतीही व्यक्ती
  • शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ)
  • बचत गट (एसएचजी)
  • शेतकरी सहकारी संस्था (एफसीओ)
  • संयुक्त दायित्व गट (जेएलजी)

अधिक माहितीसाठी www.nim.udyamimitra.in किंवा dahd.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान ३ ते ५ एकर शेती असलेल्या युवकांना प्रकल्प किमतीच्या केवळ १० टक्के रक्कम गुंतवून व्यवसाय सुरू करता येतो. तब्बल ५० टक्के अनुदान देण्यात येते. युवकांनी योजनेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुसंवर्धन विभागात संपर्क साधावा. 
- डॉ. अमितकुमार दुबे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

Web Title: Latest News agri business Subsidy of up to 50 lakhs for agricultural businesses read in detail.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.