Join us

Agriculture News : परभणी कृषी विद्यापीठात पशुधनाचा जाहीर लिलाव, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 21:15 IST

Agriculture News : कृषि विद्यापीठ परभणी (Parbhani Krushi Vidyapith) यांच्या वतीने पशुधनाचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

Agriculture News :  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी (Parbhani Krushi Vidyapith) यांच्या वतीने पशुधनाचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता नियोजित आहे. ज्या शेतकऱ्यांना लिलावात सहभागी व्हायचे आहे, त्या शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी विद्यापीठामार्फत आवाहन करण्यात आले आहे. 

संकरित गो पैदास प्रकल्प अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे देवणी व होलदेव या पशुधनांचा जाहीर लिलाव ठेवण्यात आला आहे. यासाठी काही नियम ठेवण्यात आले आहेत, ते पुढीलप्रमाणे.... 

  1. लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीस लिलावापुर्वी प्रथम ४ हजार रुपये अनामत रक्कम भरून लिलावात भाग घेता येईल. 
  2. अनामत रक्कम संपूर्ण लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत मिळेल.
  3. लिलावात उच्चतम बोलीवर म्हणजेच जास्तीत जास्त बोली लावणाऱ्या व्यक्तीस नावावर लिलाव सोडला जाईल.
  4. लिलाव सुटलेल्या व्यक्तीस बोलीप्रमाणे संपूर्ण रक्कम तात्काळ भरावी लागेल. तसे न झाल्यास सदरील व्यक्तीची अनामत रक्कम जप्त होईल.
  5. पूर्ण रक्कम भरूनच जनावर ताब्यात देण्यात येईल.
  6. एखाद्या जनावरांच्या बोलीची किंमत समितीस कमी आहे, असे वाटल्यास त्या जनावराचा फेर लिलाव करण्यात येईल किंवा अपेक्षेप्रमाणे किंमत न आल्यास त्या जनावराचा लिलाव रद्द करणे इत्यादी अधिकार संबंधीत लिलाव समितीकडे राहतील.
  7. लिलावा संबंधीचे सर्व अधिकार समितीकडे राखुन ठेवलेले आहेत.
  8. पूर्ण रक्कम भरून जनावरे तात्काळ घेऊन जावे, अन्यथा प्रतिदिन २०० रुपये प्रमाणे देखभाल खर्च द्यावा लागेल. 
  9. जास्तीत जास्त ८ दिवस नंतर जनावरे देण्यात येणार नाहीत.
  10. लिलावात अनामत रक्कम भरण्याची वेळ लिलावाच्या दिवशी सकाळी ९ ते १२ राहील.

 

Animal Feed Business : पशुखाद्य व्यवसाय सुरु करायचाय, 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसायगाय