Join us

Veterinary Service Charges : विविध पशुवैद्यकीय सेवांसाठी किती सेवाशुल्क आकारलं जातं? इथं वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 3:57 PM

Veterinary Service Charges : पशुसंवर्धन विभागांतर्गत रुग्ण पशु-पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी आकारण्यात येत असलेल्या विविध सेवांसाठीच्या सेवाशुल्काच्या दरात सुधारणा करण्याची आल्या आहेत. 

Veterinary Service Charges : राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत शेतकरी / पशुपालक यांच्याकडील रूग्ण पशु-पक्ष्यांना विविध पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी आकारावयाच्या सेवाशुल्कांच्या (Veterinary Service Charges) सुधारीत दरांचा तपशिल असून, सदरचे दर हे प्रति पशु, पक्षी, तपासणी, चाचणीसाठीचे आहेत. पशुसंवर्धन विभागांतर्गत रुग्ण पशु-पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी आकारण्यात येत असलेल्या विविध सेवांसाठीच्या सेवाशुल्काच्या दरात सुधारणा करण्याची आल्या आहेत. 

पशुसंवर्धन विभागांतर्गत सर्व प्रकारच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत शेतकरी / पशुपालक यांच्याकडील रूग्ण पशु-पक्ष्यांना विविध पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी सेवाशुल्काचे दर निश्चित करण्यात आलेले असून त्यास बराच कालावधी लोटलेला आहे. रुग्ण पशुंवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या औषधी, शल्यचिकित्सेसाठी आवश्यक हत्यारे, उपकरणे, अवजारे इ. च्या किंमत्तीत मागील काही वर्षात वाढ झालेली आहे. त्यानुसार पुढील दरपत्रक पाहुयात.... 

दरपत्रक पुढीलप्रमाणे 

 

अ.क्र.बाबसुधारित दर (रूपये)
1पशुस्वास्थ्य विषयक सेवा केस पेपर शुल्कनिशुल्क
 उपचार१०/-
 खच्चीकरण (वळू, रेडा, वराह, बोकड व नर मेंढा)१०/-
2रोग प्रतिबंधक लसीकरण 
 जनावरे (लहान तसेच मोठी)१/-
 कुक्कुट पक्षी१/-
3शस्त्रक्रिया  
 लहान शस्त्रक्रिया  
 कुत्री व मांजर१००/-
 मोठी जनावरे (खच्चीकरण वगळून)५०/-
 वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर२०/-
 मोठ्या शत्रक्रीया 
 कुत्री व मांजर१५०/-
 मोठी जनावरे७०/-
 वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर५०/-
4कृत्रिम रेतन व अनुषंगिक सेवा 
 कृत्रिम रेतन (दवाखान्यात)५०/-
 कृत्रिम रेतन (शेतकऱ्यांच्या दारात)५०/-
5गर्भधारणा तपासणी (कृत्रिम रेतना व्यतिरिक्त)१०/-
6गायी/म्हशींतील वंध्यत्व तपासणी१०/-
7रोग नमुने तपासणी 
 डी.एल.सी.१०/-
 आरबीसी काऊंट१०/-
 डब्ल्यूबीसी काऊंट१०/-
 रक्त काचपट्टी१०/-
 शेण नमुने१०/-
 मुत्र नमुने१०/-
 स्क्रॅपिंग्ज१०/-
 इतर (वरील चाचण्या व्यतिरिक्त)१०/-
8रक्त व रक्तजल तपासणी 
 ग्लुकोज२०/-
 फॉस्फरस२०/-
 क्रियेटीनीन२०/-
 कॅल्शियम२०/-
 रक्तातील हिमोग्लोबीन२०/-
9उती नमुने तपासणी१०/-
10पाणी, खाद्य, व्हिसेरा नमुन्याची विषबाधा तपासणी१००/-
11दुध नमुने तपासणी१००/-
12क्ष – किरण तपासणी 
 लहान जनावरे (कुत्री, मांजर, वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर)१००/-
 मोठी जनावरे१००/-
13सोनोग्राफी 
 लहान जनावरांच्या प्रत्येक तपासणीकरिता (कुत्रे, शेळी, मेंढी, वआरबीसी काऊंट राह व इतर लहान पशु)१००/-
 सर्व मोठ्या जनावरांच्या प्रत्येक तपासणीकरिता१००/-
14आरोग्य दाखले 
 मोठी जनावरे५०/-
 लहान जनावरे२०/-
15महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा १९७६ (सुधारणा १९९५) अंतर्गत अनुसूचित पशुची कत्तलपुर्व तपासणी२००/-
16शवविच्छेदन (न्याय वैद्यक प्रकरण वगळून)१००/-

शासन निर्णय  :  या लिंकवर क्लिक करून पहा.. 

टॅग्स :शेती क्षेत्रदुग्धव्यवसायशेतीराज्य सरकार