Join us

Livestock Care : रखरखत्या उन्हात जनावरांना सावलीत बांधाच, शिवाय 'हा' सोपा उपाय करून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:11 IST

Livestock Care : उन्हात जनावरांच्या शरीराचे तापमान (Animal Care In Summer) खूप वाढते, ज्यामुळे त्यांना अनेक त्रास होऊ शकतात,

Livestock Care : उन्हाचा कडाका (Temperature) प्रचंड वाढला आहे. माणसांना हे ऊन असह्य होत असून जनावरांवर देखील याचा परिणाम होऊ लागला आहे. या स्थितीत जनावरांच्या शरीराचे तापमान (Animal Care In Summer) खूप वाढते, ज्यामुळे त्यांना अनेक त्रास होऊ शकतात, अगदी मृत्यू देखील होऊ शकतो. उष्माघात टाळण्यासाठी जनावरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. 

उष्माघाताची लक्षणे

  • जनावर अस्वस्थ होते, जनावराची तहान-भूक मंद होते.
  • जनावराचे शरीराचे तापमान १०४ ते १०६० फॅ. इतके वाढून कातडी कोरडी पडते.
  • जनावराचा श्वासाच्छसाचा दर वाढून धाप लागल्या सारख होते.
  • जनावरांचे डोळे लालसर होवून डोळ्यातून पाणी गळते.
  • जनावरांना ८ तासानंतर अतिसार होतो.
  • जनावराचे लघवीचे प्रमाण कमी होते.
  • जनावरे बसून घेतात.
  • अति उष्णतेमुळे जनावरांनासुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यामध्ये जनावरांच्या नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वाहते.

उपचार काय कराल? 

  • जनावरास थंड पाण्याने स्वच्छ धूवुन काढावे, झाडाच्या सावलीत अथवा इतर थंड ठिकाणी बांधावे. 
  • जनावरांच्या दोन्ही शिंगाच्यामध्ये पाण्याने ओले केलेले कापड ठेवून त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे.
  • जनावरास नियमित व वारंवार सर्वसाधारणतः ३-४ वेळेस भरपूर थंड पाणी पाजावे
  • उष्माघात झालेल्या जनावरांना कोणत्याही प्रकारच्या जुलाबरोधक औषधाचा उपयोग होत नाही. यावर तातडीने
  • पशुवैद्यकाकडून उपचार सुरू करावेत.
  • उन्हाळयामध्ये उन्हाच्या अती प्रखर किरणाचा संपर्कामुळे किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता, तसेच पन्हाळी किंवा सिमेंटच्या (जी.आय. सीट) पत्र्याचा वापर केलेल्या एकाच गोठ्यात जास्त जनावरांना एकत्र डांबून गर्दी केल्यास उष्माघात चा त्रास होऊ शकतो. म्हणून त्यावर ऊसाचे पाचट किंवा इतर आच्छादन करणे गरजेचे असते.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :शेती क्षेत्रतापमानदुग्धव्यवसायगायशेतकरी